Maratha Kranti Morcha Sakal
सातारा

Maratha Reservation : साताऱ्यातून अंतरवालीकडे जाणार लाखो मराठे

मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने राज्यभर पुन्हा उचल घेतली आहे. या मुद्द्यासाठी ‘करो या मरो’ची भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे-पाटील यांना साथ देण्यासाठी जिल्ह्यातील मराठा समाज सरसावला आहे.

सकाळ वृत्तसेवा

सातारा - मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने राज्यभर पुन्हा उचल घेतली आहे. या मुद्द्यासाठी ‘करो या मरो’ची भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे-पाटील यांना साथ देण्यासाठी जिल्ह्यातील मराठा समाज सरसावला आहे.

त्यातूनच मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे १४ ऑक्टोबरला आयोजित केलेल्या मराठा महासभेचा आवाज बुलंद करण्यासाठी राजधानी साताऱ्यातून तब्बल एक लाख मराठा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, विविध मराठा संघटनांबरोबरच सर्वसामान्य मराठ्यांच्या वैयक्तिक पातळीवरही सभेला जाण्याच्या नियोजनाने वेग घेतला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले होते. या उपोषणकर्त्यांवर झालेल्या लाठीहल्ल्यामुळे अंतरवाली सराटी व मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले.

प्रसिद्धी माध्यमे व शासनानेही या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतली. त्यातून जरांगे यांची मराठा आरक्षणाची भूमिका राज्यातील सर्व मराठा समाजातील घराघरांत पोचली. गेले दीड महिना मनोज जरांगे हे राज्यातील प्रत्येक मराठा समाजातील घरात चर्चेचा विषय बनले. निःस्वार्थ व ठामपणे आंदोलन करणारे म्हणून त्यांची भूमिका राज्यातील मराठा समाजाला पटू लागली.

१७ दिवस चाललेल्या त्यांच्या उपोषणानंतर शासनाने एक महिन्याची मुदत मागून घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांनी उपोषण सोडले; परंतु आंदोलन सुरू राहणार, अशी भूमिका घेतली. त्यानंतर त्यांनी राज्याचा दौरा सुरू केला. त्याची कणखर भूमिका पटत असल्यामुळे त्यांच्या दौऱ्यांना प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अगदी पहाटे तीनला जरी सभा झाली, तरी हजारो मराठा बांधव तेथे ठाण मांडून बसत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone Security Alert: ‘आयफोन’ वापरत असाल तर आताच करा ‘हे’ काम, अन्यथा तुमचा फोन होणार हॅक!

AAP Pune Manifesto : पुणे पालिकेसाठी 'आप'चा जाहीरनामा प्रसिद्ध; महिलांना मोफत बस प्रवास आणि 'मोहल्ला क्लिनिक'चे आश्वासन!

Sangli Election : एकाच प्रभागात अनेक दावे, अनेक गट, भाजपची अंतर्गत फूट, राष्ट्रवादीची जातीय मांडणी; प्रभाग आठ बनला रणांगण

Mumbai - Goa Highway : कोकणाच्या विकासाचा कणा अजूनही खड्ड्यातच; मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा अंत न दिसणारा प्रवास

Latest Marathi News Live Update : पुणे – नाशिक महामार्गावर रास्तारोको, वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT