sakal
सातारा

कऱ्हाड: बाजार समिती, खरेदी-विक्री संघाने सोयाबीन खरेदी करावी

शेतकऱ्यांची सहकार मंत्र्याकडे मागणी

हेमंत पवार

कऱ्हाड : सोयाबीनचे दर गडगडले नसुन ते व्यापाऱ्यांनी संगनमताने पाडले आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व त्यांची लूट थांबवण्यासाठी बाजार समित्या व सहकारी खरेदी विक्री संघांनी सोयाबीन योग्य भावाने खरेदी करुन व्यापाऱ्यांच्या मनमानीला पायबंद घालावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाव्दार केली.

शेतकरी शिवाजी पाटील, विश्वजित थोरात, रवींद्र यादव, दत्तात्रय थोरात, दादासाहेब पाटील, पंढरीनाथ माने, सचिन महाडिक, अनिल साळुंखे आदींनी निवेदन दिले. निवेदनाची प्रत उपनिबंधक यांनाही देण्यात आले.

निवेदनातील माहिती अशी

बाजार समित्या व खरेदी विक्री संघ हे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी स्थापन केलेल्या संस्था आहेत. मात्र आज या संस्थांवर व्यापाऱ्यांनी कब्जा केला असून अडते,दलाल यांची मनमानी सुरू आहे. यंदा अस्मानी संकटाने खरीप पिके, ऊस पिकाला मोठा फटका बसला. अशातच सोयाबीन हे अडचणीच्या वेळेला चार पैसे मिळवून देणारे कमी कालावधीचे पीक म्हणून ते पिक शेतकरी करतात. त्याची काढणी सुरु असुन सोयाबीन मोठया प्रमाणावर मार्केटमध्ये आणत आहेत. मात्र दुर्दैवाने भाव निच्चांकी पातळीवर पाडण्यात आले आहेत.

काही ठिकाणी वजनातील तूट, काटामारी करून शेतकऱ्यांना लुटले जात आहे. बाजार समिती, खरेदी विक्री संघ यांच्या आवारातच शेतकऱ्यांना लुटले जात आहे. शेतकरी आर्थिक दृष्ट्या प्रचंड नुकसानीत येत आहे. त्यामुळे बाजार समिती, सहकारी खरेदी विक्री संघ, शेतकरी सहकारी संघ यांना सहकारमंत्री यांनी आदेश देऊन सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू करण्यास भाग पाडावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Navy Collision : अरबी समुद्रात भारत-पाक नौदलाच्या जहाजांची धडक; भारताचा पाकिस्तानला तीव्र इशारा

‘आज मुश्किल से बचे...’ शहनाज गिल बसलेलं विमान हवेत जोरात हलू लागलं, अभिनेत्री प्रचंड घाबरली, Viral Video

'सरकार चर्चा करायला तयार, शिवराळ भाषा आम्ही सहन करणार नाही'

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

Marathi News Live Updates : गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड लागू

SCROLL FOR NEXT