Labor Day esakal
सातारा

माथाडींचा रेल्वे स्थानकाबाहेर 'कामगार दिन'; शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटना रस्त्यावर

कोरोना काळात जीवनावश्यक सेवा सुरळीत राहण्यासाठी माथाडी कामगार जीवावर उदार होवून सेवा बजावत आहेत.

राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : बाजार समित्या व अन्य ठिकाणी जीवनावश्यक मालाच्या चढ-उताराचे काम करणा-या माथाडी कामगार व अन्य घटकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून त्यांना प्रवासाच्या परवानगीसह विमा संरक्षण द्यावे, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगारांनी आज नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई परिसरातील विविध रेल्वे स्थानकाबाहेर रेल्वेच्या आधिकाऱ्यांना निवेदने देवून महाराष्ट्र व कामगार दिन साजरा केला.

कोरोना संसर्गाच्या काळात गेल्यावर्षी आणि आत्तासुद्धा जीवनावश्यक सेवा सुरळीत राहण्यासाठी माथाडी कामगारांसह सलग्न अन्य घटक जीवावर उदार होवून सेवा बजावत आहेत. बाजार समितीच्या आवारात अन्न-धान्य, कांदा बटाटा, मसाले, भाजी, फळे, गॅस सिलिंडर आदी जीवनावश्यक मालाची तसेच जनावरांचे खाद्य व खतांच्या चढ-उताराची कामे त्यांच्यामार्फत सुरू आहेत. ही सेवा बजावताना अनेक माथाडी कामगारांना कोरोनाची लागण झाली. काहींचा त्यामध्ये मृत्यूही झाला. अजूनही ही मालिका सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर माथाडी कामगार व अन्य घटकांसाठी पॅकेज जाहीर करावे. कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी त्यांना रेल्वे व बसमधून प्रवासाला परवानगी द्यावी.

तसेच त्यांना विमा संरक्षणाबरोबरच मृताच्या कुटुंबीयांना मदत करावी आदी मागण्या महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने शासनासमोर ठेवून विविध आंदोलनाव्दारे त्याचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. आज माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगारांनी मुंबईत मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वेच्या मस्जिद बंदर, डाक यार्ड रोड, रे रोड, कुर्ला, मानखुर्द, वाशी, सानपाडा, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दादर, भांडूप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली कल्याण, उल्हासनगर, मुंबई सेंट्रल, बांद्रा, अंधेरी, बोरीवली, दहिसर, डहाणू आदी रेल्वे स्थानकाबाहेर कोरोनाची नियमावली आणि कायदा व सुव्यवस्थेचे पालन करीत स्थानक प्रबंधकांना निवेदन सादर करून कामगार व महाराष्ट्र दिन साजरा केला.

Edited By : Balkrishna Madhale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT