Narendra Patil esakal
सातारा

जबरा फॅन! देवेंद्र फडणवीसांचं नाव हृदयावरच गोंदवणार होतो; पण..

नरेंद्र पाटील फडणवीसांचे जबरा फॅन; हातावर गोंदलं देवेंद्रांचं नाव

उमेश बांबरे

सातारा : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे (Mathadi workers) नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी शिवसेनेला (Shivsena) अखेरचा जय महाराष्ट्र केल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी मैत्रीचे संबंध असल्याचे त्यांनी वारंवार बोलून दाखवले आहे. देवेंद्रजी आमच्या मनात असल्याचे म्हणत त्यांनी नुकतेच आपल्या हातावर 'देवेंद्र' हे नावच गोंदून घेतलं आहे. त्यामुळे, त्यांचा देवेंद्र फडणवीसांवरील असलेला जिव्हाळा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. नरेंद्र पाटील यांनी नुकतेच आपल्या फेसबुक पेजवर हातावर देवेंद्र नाव गोंदल्याचा फोटो व्हायरल केला आहे. सध्या याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

नरेंद्र पाटलांचा देवेंद्र फडणवीसांवरील असलेला जिव्हाळा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव असल्याने त्यांना अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने असलेल्या महामंडळाचे अध्यक्षपद देऊन भाजप व शिवसेनेच्या युती सरकारने नरेंद्र पाटील यांचा सन्मान केला. याचा काळात या महामंडळाचे पूनर्जिवित करून महामंडळासाठी निधीची भरीव तरतूद केली. माथाडी कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी श्री. फडणवीस यांनी सातत्याने मदत केली. त्यामुळे नरेंद्र पाटील यांची देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळीक निर्माण झाली. तेथूनच त्यांच्या मैत्रीचे पर्व सुरू झाले. विविध कार्यक्रम, गणेशोत्सव तसेच माथाडींचे विविध कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस आवर्जून उपस्थित राहात असत.

गणेशोत्सवासाठी श्री. फडणवीस नरेंद्र पाटलांच्या कुटुंबासह घरी जात होते. त्यामुळे त्यांची कौटुंबिक जवळीकही निर्माण झाली. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांशी त्यांची घट्ट मैत्रीचे नाते निर्माण झाले. त्यांच्या या मैत्रीतूनच नरेंद्र पाटील यांनी आपल्या हातावर देवेंद्र गोंदले आहे. याबाबतचा फोटो त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर व्हायरल केला. त्यानंतर मात्र, सोशल मीडियावर या फोटोची चांगलीच चर्चा रंगली. याविषयी नरेंद्र पाटील म्हणाले, मराठा आरक्षण प्रश्नात देवेंद्र फडणवीस यांच्या सिंहाचा वाटा होता. पाटणच्या दौऱ्यात पूरग्रस्तांना मदत करताना देवेंद्र फडणवीस यांच्या मदत करण्याच्या वृत्तीने मी प्रभावित झालो होते. त्यातूनच मी देवेंद्र नाव हातावर गोंदले आहे. मुळात देवेंद्र हे माझ्या हृदयात आहेत. मी त्यांचे नाव हृदयावरच गोंदणार होतो. पण हातावर गोंदल्याचं त्यांनी सांगितलं.

टॅटू पाहून फडणवीस रागवले, पण..

हा टॅटू पाहून देवेंद्र फडणवीस माझ्यावर रागवले. मात्र, कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण करण्याची विनंती मी त्यांना केली. त्यांच्या काम करण्याच्या वृत्तीने सात जन्म फडणवीसांचा पाईक राहून काम करण्याची माझी इच्छा असल्याची भावनाही नरेंद्र पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT