Mayani
Mayani esakal
सातारा

साताऱ्यातील 'या' गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखलं; दोन्ही लाटांत गावं सुरक्षित!

संजय जगताप

मायणी (सातारा) : स्वयंशिस्त, नियमांचे काटेकोरपणे पालन आणि गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे कोरोनाला (Coronavirus) अद्याप वेशीबाहेर ठेवण्यात खटाव तालुक्‍यातील शेडगेवाडी (चितळी) गावाने यश मिळवले आहे. मायणी व चितळी या दोन मोठ्या गावांदरम्यान शेडगेवाडी हे सुमारे 550 लोकवस्तीचे गाव आहे. कोरोनाच्या संसर्गाची पहिली लाट येऊन गेली. दुसऱ्या लाटेनेही शहरांबरोबर ग्रामीण भागातही मुसंडी मारली. अशा स्थितीतही शेडगेवाडी ग्रामस्थांनी एकजुटीची वज्रमूठ आवळत स्वयंशिस्तीने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोपणे पालन केले. (Mayani And Chitati Both Villages In Satara Has Stopped From Disease Of Coronavirus Satara Marathi News)

मायणी व चितळी या दोन मोठ्या गावांदरम्यान शेडगेवाडी हे सुमारे 550 लोकवस्तीचे गाव आहे.

मास्क वापरणे, अंतर ठेवणे, हात धुणे ही त्रिसूत्री कटाक्षाने राबवली. त्यासाठी ज्योतिर्लिंग सांस्कृतिक मंडळ, शिवगर्जना मंडळ, फ्रेंड्‌स ग्रुप या तरुण मंडळांनी घरोघरी जाऊन जनजागृती केली. सरकारने माझे गाव कोरोनामुक्त गाव ही योजना नुकतीच जाहीर केली. मात्र, शेडगेवाडीकरांनी सुरवातीपासूनच ती संकल्पना राबवली. त्यामुळे गावात नवीन व्यक्तींना प्रवेश दिला जात नव्हता. ग्रामदैवत जोतिबाची यात्रा असूनही चाकरमानी व सोने-चांदी गलाई व्यावसायिकांना गावी न येण्याचे आवाहन केले. शेतीची कामे करण्यासाठी ठराविक कामगारांचे गट केले. त्यांनीच एकत्रित काम करण्याचे बंधन घालण्यात आले.

एका गटातील व्यक्ती अन्य गटात जाणार नाही, असे निर्बंध घातले. अगदी परगावी कामासाठी गेले तरीही अन्य कामगारापासून अलिप्त राहण्याची त्यांनी खबरदारी घेतली. गावातील मुलांचे गटही एकमेकांत न मिसळता खेळत आहेत. गावातील ज्येष्ठ नागरिकही तरुणांना सहकार्य करत आहेत. ग्रापंचायतीच्या माध्यमातून गावात वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. अशा विविध उपाययोजना व सामूहिक प्रयत्नांमुळे कोरोनाचा शिरकाव अद्याप तेथे होऊ शकला नाही.

लोकांनी सहकार्य केले, प्रतिसाद दिला. सर्वांनी सामूहिक प्रयत्न करत, एकमेकांची काळजी घेत स्वयंशिस्त पाळली. त्यामुळे अजून तरी गाव कोरोनामुक्त आहे.

-श्रीरंग फाळके, सामाजिक कार्यकर्ते, शेडगेवाडी

Mayani And Chitati Both Villages In Satara Has Stopped From Disease Of Coronavirus Satara Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT