यशवंत विकास सेवा सोसायटीची निवडणूक sakal
सातारा

मायणी : गुदगे गटाची येळगावकर गटास धोबीपछाड

यशवंत विकास सोसायटीत राष्ट्रवादी सर्व १३ जागांवर विजयी; गुदगे समर्थकांचा जल्‍लोष

सकाळ वृत्तसेवा

मायणी: येथील यशवंत विकास सोसायटीच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सुरेंद्र गुदगे यांच्या समर्थकांनी सर्व १३ जागा जिंकत विरोधी येळगावकर गटाचा धुव्वा उडवला. येथील यशवंत विकास सेवा सोसायटीची निवडणूक ६० वर्षांनी झाली.

पूर्वाश्रमीचे गुदगे गटाचेच काही नाराज कार्यकर्ते येळगावकर गटाला मिळाले. सातत्याने बिनविरोध होणाऱ्या सोसायटीच्या निवडणुकीला ब्रेक लागला. अनेक वर्षांतून पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने विरोधकांनीही कंबर कसली होती. आज झालेल्या निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा उडवत गुदगे गटाने १३ पैकी १३ जागा जिंकल्या. एकूण १,८१० मतदारांपैकी ८५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदारसंघ, विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते याप्रमाणे : सर्वसाधारण कर्जदार मतदारसंघ- अमोल शंकर चव्हाण (५०८), सुनील बाबूराव माने (५८०), अनिल सुदाम माळी (६१०), लक्ष्मण बाबूराव जाधव (२२२), दादासो विठोबा माळी (५७१), चंद्रकांत ज्ञानदेव यलमर (५८६), गणपत हणमंत देशमुख (४९६), चंद्रकांत आप्पासो शिंदे (५७९), नाथबाबा मलू सानप (५६६). महिला राखीव- उषा युवराज चव्हाण (५९४), सुवर्णा शिवाजी साळुंखे (५७१). इतर मागास मतदारसंघ- सादिक आबू नदाफ (५८४). अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघ- सुभाष तुकाराम भिसे (५७५).दरम्यान, विजय घोषित होताच गुदगे समर्थक कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करीत गुलालाची उधळण केली.

सुरेंद्र गुदगेंना खांद्यावर घेऊन कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दरम्यान, आजच माजी आमदार (कै.) भाऊसाहेब गुदगे यांची जयंती असल्याने त्यांच्या विचारांची सोसायटी गुदगे गटाकडे अबाधित ठेवण्यात सुरेंद्र गुदगे यांना यश आल्याने भाऊसाहेबांचे आशीर्वाद मिळाल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT