Satara ST Strike News sakal
सातारा

मेकॅनिक आणि नियंत्रक होणार चालक, वाहक; कर्मचाऱ्यांचा संप मिटेपर्यंत निर्णय

एसटी मार्गावर आणण्यासाठी नव्या पर्यायाचा विचार

हेमंत पवार

कऱ्हाड : एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप काही केल्या मिटेना अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी, नोकरदार, विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्याचा विचार करून आता एसटी प्रशासनाने बस मार्गावर आणण्यासाठी महामंडळाच्या उपलब्ध अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकीच काहींना चालक व वाहक करण्याची तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत चालकांमधून झालेले सहायक वाहतूक निरीक्षक, वाहन तपासनीस व प्रवासी वाहतुकीचा परवाना असणाऱ्या मेकॅनिकना चालक म्हणून तर वाहतूक नियंत्रकांचा वापर वाहक म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. (Satara ST Strike News)

एसटीच्या कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी सुरू असलेला संप गेल्या अनेक दिवासांपासून सुरूच आहे. त्या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री अनिल परब यांच्याबरोबर अनेक बैठका झाल्‍या. भाजपचे माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांनीही कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतरही कर्मचारी ऐकत नाहीत म्हटल्यावर श्री. खोत व श्री. पडळकर यांनी त्यातून माघार घेतली. मध्यंतरी ज्‍येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनीही तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनीही कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन केले. मात्र, तरीही त्यातून तोडगा निघालेला नाही. कर्मचारी अजूनही काम बंद आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या बहुतांश बसची चाके जागेवरच आहेत.

परिणामी एसटीला कोट्यवधींचा तोटा सोसावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी, नोकरदार, विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यांच्यावर दररोज पायपीट करण्याची वेळ आली आहे. त्याचा विचार करून एसटीची चाके मार्गावर आणण्यासाठी एसटी प्रशासनाकडून वेगवेगळे मार्ग अवलंबण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता एसटीकडून जे चालक पदोन्नतीने सहायक वाहतूक निरीक्षक, वाहन तपासनीस झाले आहेत, ज्या मेकॅनिकांकडे प्रवासी वाहतुकीचा परवाना आहे अशा कर्मचाऱ्यांना चालक म्हणून काम करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. त्याचबरोबर वाहकांमधून बढती झालेल्या वाहतूक नियंत्रकांचा वापर वाहक म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी चालक-वाहकांना प्रशिक्षणही देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाने एक आदेश जारी केला आहे.

३०० रुपये अतिरिक्त भत्ता मिळणार

ज्या सहायक वाहतूक निरीक्षक, वाहन तपासनीस व प्रवासी वाहतुकीचा परवाना असणाऱ्या मेकॅनिक यांचा संप काळात चालक म्हणून वापर केला जाईल, त्याचबरोबर वाहतूक नियंत्रकांचा वापर वाहक म्हणून करण्यात येईल. त्यांना महामंडळाकडून ३०० रुपये अतिरिक्त प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचारी चालक-वाहक म्हणून काम करण्यास तयार होतील, असाही एसटी प्रशासनाचा कयास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT