medical sakal
सातारा

सातारा :मेडिकल कॉलेजचे टेंडर महिनाअखेरास

तब्बल ४९५ कोटींचा इमारतीचा आराखडा तयार

उमेश बांबरे -सकाळ वृत्तसेवा

सातारा : सर्व सातारकरांचे लक्ष लागलेल्या सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मध्यवर्ती प्रयोगशाळेचे भूमिपूजन सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्या हस्ते झाले. प्रत्यक्ष इमारतीच्या ४९५ कोटींच्या सुसज्ज आराखड्यास नुकतीच वैद्यकीय संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे जानेवारीअखेर टेंडर(Tender) प्रक्रिया सुरू होणार आहे. एकूण चार टप्प्यांत हे बांधकाम होणार असून, साधारण मार्चमध्ये प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होणार आहे. या बांधकामावर निरीक्षण करण्याची सर्व जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर राहणार आहे.

सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया यावर्षीपासून होणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी झालेली आहे. प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मध्यवर्ती प्रयोगशाळेचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते मागील आठवड्यात झाले आहे. त्याचे कामही वेगाने होणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचा सुसज्ज असा एकूण ४९५ कोटी रुपयांचा इमारत बांधकाम आराखडा तयार झाला आहे.(Satara News)

या आराखड्यास वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या सर्व संचालकांनीही मान्यता दिलेली आहे. बारामती व दिल्ली वैद्यकीय महाविद्यालयांच्या धर्तीवर हा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या इमारतीचे विशेष आकर्षण राहणार आहे. आराखड्यातील बांधकामे चार टप्प्यांत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निरीक्षणाखाली होणार आहेत. पहिल्या टप्प्यात मुख्य इमारत व त्यानंतर इतर इमारतींची बांधकामे होतील.

सातारा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकाम आराखड्यास सर्व संचालक मंडळाने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे जानेवारीअखेरपर्यंत बांधकाम टेंडर प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. एकूण ४९५ कोटींच्या इमारत आराखड्यानुसार टप्प्याटप्प्याने बांधकाम होणार आहे. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे निरीक्षण राहणार आहे.

- डॉ. आर. डी. चव्हाण, डीन, सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT