Balasaheb Patil esakal
सातारा

पालकमंत्री मध्यरात्री थेट पोलिस ठाण्यात; विराटच्या कुटुंबाला 'आधार'

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

पालकमंत्र्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने स्थिती नियंत्रणात येण्यास मदत झाली.

कऱ्हाड (सातारा) : येथील धवार पेठेत नगरपालिकेने (Karad Municipality) खोदलेल्या खड्ड्यात चार वर्षांचा चिमुरड्याचा मृत्यू झाला. त्यानंतर बुधवार पेठेत तणाव होता. विराटच्या नातेवाइकांनी मध्यरात्री पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. त्या वेळी मुंबईहून कऱ्हाडला येत असलेल्या पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) हे मध्यरात्री दीडच्या सुमारास थेट कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात (Karad City Police Station) आले. तेथे विराटच्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तपासाच्या सूचना केल्या. पालकमंत्र्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने स्थिती नियंत्रणात येण्यास मदत झाली.

मुंबईला मंत्रिमंडळाची बैठक संपवून पालकमंत्री पाटील कऱ्हाडकडे येत होते. त्या वेळी विराट विजय चव्हाण याच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी समजली. ते शिरवळपर्यंत होते. साताऱ्यापर्यंत येईपर्यंत त्यांनी पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांना फोन लावून माहिती घेतली. त्यानंतर पालकमंत्री थेट कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात आले. त्यांनी विराटच्या आई- वडिलांसह अन्य नातेवाइकांची भेट घेऊन सांत्वन केले. संतप्त नागरिकांशीही त्यांनी संवाद साधला. नागरिकांनाही शांत करत पोलिस योग्य कारवाई करतील, असे आश्वासित केले.

लोकशाहीचे गट नेते सौरभ पाटील, अख्तर आंबेकरी, जयंत बेडेकर, दक्ष कऱ्हाडकर ग्रुपचे प्रमोद पाटील, माजी नगरसेवक आनंदराव लादे उपस्थित होते. त्यांच्याशीही चर्चा करून पालकमंत्र्यांनी पोलिसांशी स्वतंत्रपणे संवाद साधला. पोलिस उपअधीक्षक रणजित पाटील, बी. आर. पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे, अमित बाबर उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी ठिय्या मांडलेल्या विराटच्या आप्तेष्टांसह नातेवाईकांशी चर्चा केली. पोलिस कारवाईची माहिती देत नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर विराटच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्याची कबुली दिली. तब्बल दीड तास पालकमंत्री पाटील यांनी पोलिस ठाण्यात थांबून परिस्थिती हाताळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT