Balasaheb Patil esakal
सातारा

जरंडेश्वर सुरु नसता तर..; कारखान्याबद्दल काय म्हणाले सहकारमंत्री?

हेमंत पवार

कारखान्यांबाबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी अधिवेशनात प्रश्न मांडला होता.

कऱ्हाड (सातारा) : उसाचं सातारा जिल्ह्यात (Satara District) मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं आहे. अजूनही कारखाने सुरुच आहेत. जरंडेश्वर साखर कारखाना विकायचं बॅंकेनं ठरवलं. त्यानंतर एकानं तो विकत घेतला असून त्यामार्फत गाळप सुरुय. जरंडेश्वर कारखाना (Jarandeshwar Factory) सुरु नसता, तर त्या भागातील ऊस गाळपाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असता, असं मत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी व्यक्त केलं.

जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात सुरु असलेल्या उलटसुलट चर्चेसंदर्भात पत्रकार परिषदेतील प्रश्नावर मंत्री पाटील बोलत होते. ते म्हणाले, जरंडेश्वर साखर कारखाना (Jarandeshwar Sugar Factory) आर्थिक अडचणीत गेला. त्यावेळी बॅंकेनं साखर कारखाना विकायचा निर्णय घेतला. त्या कारखान्याची किंमत ४० कोटी रुपये ठरली होती. काही जणांनी तो विकत घेण्यासाठी टेंडर भरले. एका कंपनीनं तो ६५ कोटी ७० लाखांना विकत घेतला आहे. तो कारखाना सुरु केला. त्याची विस्तारवाढही करण्यात आलीय. जिल्ह्यात उसाचं मोठं उत्पादन झालं आहे. तो साखर कारखाना सुरु नसता, तर त्या भागातील ऊस गाळपाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असता. त्यासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी अधिवेशनात प्रश्न मांडला होता. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), सहकारमंत्री म्हणून मी उत्तर दिलंय.

उसाच्या गळीताचं कारखान्यांपुढं आव्हान

किसनवीर कारखान्याचा ऊस शरयू, जरंडेश्वर, स्वराज व अन्य काही कारखाने नेत आहेत असं सांगून मंत्री पाटील म्हणाले, राज्यात यंदा उसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं आहे. त्यामुळं उसाच्या गळीताचं कारखान्यांपुढं आव्हान आहे. राज्यातील उसाचं क्षेत्र संपल्याशिवाय कारखाने बंद करु नये, असं आदेश सर्व साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी दिले आहेत. जालना, उस्मानबादसह अन्य काही जिल्ह्यात ऊस क्षेत्र जास्त आहे. त्यामुळं १५ मे नंतरही साखर कारखान्यांचे गाळप सुरु राहील, अशी चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

SCROLL FOR NEXT