Minister Balasaheb Patil esakal
सातारा

कोरोनाच्या संकटकाळात 'राजकारण' काही केल्या थांबेना; सहकारमंत्रीही मैदानात

सामाजिक काम करताना विशिष्ठ गणवेशात काम करणे योग्य नसल्याचे स्पष्ट मत मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : सामाजिक काम करताना विशिष्ठ गणवेशात काम करणे योग्य नाही. उपजिल्हा रूग्णालयात परवा जो प्रकार झाला तो पुन्हा होवू नये, अशा सूचना पालकमंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) यांनी आज उपजिल्हा रूग्णायात दिल्या. पालकमंत्री पाटील यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे नाव न घेता त्यांनी गणवेशात येवून रूग्णांची सेवा करण्याचा प्रकार योग्य नसल्याची टिप्पणी करत पुन्हा असा प्रकार घडू नये, याची काळजी घेण्याची ताकीद उपजिल्हा रूग्णालयासह शासकीय अधिकाऱ्यांना केली. (Minister Balasaheb Patil Inspected The Sub-District Hospital Karad Satara News)

येथील उपजिल्हा रूग्णालयात (Sub-District Hospital) एका कार्यक्रमासाठी पालकमंत्री पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी लसीकरण केंद्राची माहिती घेतली. तहसीलदार अमरदीप वाकडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, नगरसेवक सौरभ पाटील उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी सूचना केल्या. त्यावेळी परवा युवक कॉंग्रेस व संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या प्रकाराचा उल्लेख करताना पालकमंत्री पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव टाळून सूचना केल्या. पालकमंत्री पाटील म्हणाले, सामाजिक संघटनांना सेवा करण्यास हरकत नाही. मात्र, विशिष्ठ गणवेशात येवून काम करण्याची गरज नाही. परवा जो प्रकार झाला. तो चुकीचा आहे. विशिष्ट गणवेशात येवून काम करणे योग्य नाही. पोलिसांनी, डॉक्टरांनी गणवेश घातला पाहिजे, ते ठिक आहे. मात्र सामाजिक काम करणाऱ्यांनी गणवेश घालण्याची गरज नाही. तसे पुन्हा होवू नये, याची काळजी घ्या. मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही.

पालकमंत्री पाटील यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांना कडक शब्दात सूचना दिल्या. लसीकरणात पारदर्शकता आणण्याची वॉर्निंग दिली. लसीकरण केंद्रावरील व्यवस्थेची पाहणी करा. तेथील लसीकरण सुरळीत पध्दतीने होईल यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना तहसीलदार वाकडे व वैद्यकीय अधिकारी शिंदे यांना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या. पालकमंत्री गेल्यानंतर तहसीलदार वाकडे यांनी प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन लसीकरणासाठी नागरिकांची यादी व टोकण पध्दतीची पाहणी केली. प्रशासनाच्या सूचनेनुसार पहिली व दुसरी लस देण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी गर्दी न करता शांततेत येऊन लसीकरण करून घ्यावे. लसीकरणात पारदर्शकता आणत आहोत. तसे न झाल्यास निदर्शनास आणू द्यावे, त्यात सुधारणा होईल. नागरिकांनी लसीकरणासाठी सहकार्य करावे असे सांगून आवाहन तहसीलदार वाकडे केले.

'71 दिवसांत 1.23 लाख मृत्यू तरीही माहिती लपविली जात आहे'

Minister Balasaheb Patil Inspected The Sub-District Hospital Karad Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sion Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! सायन पूल वाहतुकीसाठी खुला होणार; प्रशासनाकडून तारीख आली समोर

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT