Minister Nitin Gadkari
Minister Nitin Gadkari esakal
सातारा

'कारखानदारांनो, साखर-साखर करत राहिलात, तर भीक मागायची वेळ येईल'

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कोविड काळात देशाला अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्याकाळात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यांची सर्वत्र कमतरता भासत होती.

कऱ्हाड (सातारा) : देशात डॉक्टरांची कमतरता आहे. या सगळ्या कामात आता सरकारसोबत सहकारी, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी केले. दीड वर्षात कोरोना (Coronavirus) काळात संपूर्ण देश मोठ्या संकटातून गेला. पण, अशा कठीण परिस्थितीत कृष्णा हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ यांच्यापासून सिक्युरिटी गार्डनी जीव धोक्यात घालून हजारो रूग्णांचे प्राण वाचविले. कोरोनाकाळात कृष्णा हॉस्पिटलने दिलेले योगदान उल्लेखनीय असून, त्याचे देशाने अनुकरण करावे, असे मतही मंत्री गडकरी यांनी व्यक्त केले.

कृष्णा हॉस्पिटलमध्ये आयोजित कोरोना योद्ध्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, प्रशांत परिचारक, माजी आमदार आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिणगारे, भाजपाचे नेते मकरंद देशपांडे, सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर होते.

मंत्री गडकरी म्हणाले, कोविड काळात देशाला अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्याकाळात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यांची सर्वत्र कमतरता भासत होती. औषधांचाही तुटवडा होता. बेडची कमतरता भासत होती. अशा कठीण परिस्थितीत डॉक्टर्स, नर्सेस यांनी आपला जीव धोक्यात घालून, मानवतेचे कार्य कृतीतून करून दाखविले. या सगळ्यांच्या कष्टाचे मनापासून अभिनंदन आहे. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टसारख्या संस्थांनी कोरोना काळात दिलेले योगदान ऐतिहासिक आहे. किंबहुना सरकारी व्यवस्थेला जे शक्य झाले नाही, त्यापेक्षा जास्त सेवा या संस्थांनी दिल्या आहेत. सद्य:स्थितीला देशात ६०० मेडिकल कॉलेज, ‘एम्स’सारख्या ५० वैद्यकीय संस्था आणि २०० सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची ताबडतोब आवश्यकता आहे.

साखर कारखान्यांसंदर्भात भाष्य करत ते म्हणाले, विदर्भात मी एकटाच तीन साखर कारखाने चालवतो. कारखाना चालवून आता मी थकलो. महाराष्ट्रातील साखर कारखानदारांना विनंती आहे साखर उत्पादन कमी करा, इथेनॉल निर्मितीवर भर द्या. जे परावनगी मागतील त्यांना परवानग्या मी मिळवून देतो’. तसेच ‘सरकारला आउट ऑफ बॉक्स कल्पना सांगताना आणि अंमलात आणताना खूप त्रास होतो. सत्ताकारण हेच राजकारण हे मला पटत नाही. पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारांनो साखर साखर करत राहिलात तर भीक मागायची वेळ येईल, मी इथेनॉल निर्मिती संकल्पना आणली नसती तर सगळे खड्यात गेले असते. येणाऱ्या काळात आत्मनिर्भर भारत आपल्याला बनवायचा आहे. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात आजूनही खूप कामाची गरज आहे’ असेही गडकरी म्हणाले.

प्रास्तविक डॉ. सुरेश भोसले यांनी केले. ते म्हणाले, कृष्णाने कोरोना काळात अद्ययावत कोरोना वॉर्डची निर्मिती, कोविड-१९ ची तपासणी करणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या प्रयोगशाळेची उभारणी, प्लाझ्मा उपचाराचा अवलंब यामुळे कृष्णा हॉस्पिटलला कोरोनाचे हजारो रूग्ण मोफत बरे करण्यात यश आले. कोरोना काळात ३६० कोरोना पॉझिटिव्ह गरोदर महिला योग्य उपचाराने कोरोनामुक्त झाल्या. ६००० पेक्षा जास्त प्रसुती या काळात कृष्णा हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे पार पडल्या. अगदी नवजात बालकापासून ते १०० वर्षांच्या वयावृद्ध व्यक्तीलाही कोरोनामुक्त करण्यात कृष्णा हॉस्पिटलने यश प्राप्त केले असून, जिल्ह्यात केवळ येथेच म्युकरमायकोसिसवर उपचार केले जातात. आजही कोरोना वॉर्डमध्ये अनेक रूग्णांवर योग्य उपचार सुरू आहेत.

यावेळी मंत्री गडकरी यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. यामध्ये कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक व कोविड-१९ टास्क फोर्स कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. ए. वाय. क्षीरसागर, सहाय्यक कार्यकारी अध्यक्ष डॉ. संजयकुमार पाटील, मेडिसीन विभागप्रमुख डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. अपर्णा पतंगे, डॉ. अमोल गौतम, डॉ. अर्चना गौतम, चिफ नर्सिंग ऑफिसर सौ. रोहिणी बाबर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, वरिष्ठ संशोधन अधिकारी डॉ. कैलास दातखिळे, नम्रता देसाई, निखिल पाटील, डॉ. सुशील घार्गे यांचा सन्मानपत्र व गुच्छ देऊन सत्कार झाला. कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांनी स्वागत केले. डॉ. अतुल भोसले यांनी आभार मानले.

डॉ. भोसलेंच्या नेतृत्वाखाली साखर कारखानदारी उत्तम

इथेनॉल निर्मितीला प्राधान्य देण्याचे आवाहन मी सातत्याने करत आलो आहे. मला आनंद आहे, की डॉ. भोसलेंच्या नेतृत्वाखाली साखर कारखानदारी उत्तम सुरू असून, त्यांनी इथेनॉल निर्मितीला अधिकाधिक प्राधान्य देण्याचे धोरण आखलेले आहे, जे कारखान्याच्या व शेतकरी सभासदांच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे कारखानदारांनी साखर-साखर करत न राहता, विविध घटकांचाही विकास साधलाय हवा, असंही त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT