सातारा

फलटणमध्ये शिवसेना वाढीसाठी लक्ष घालणार: शंभूराज देसाई

किरण बोळे

गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ‘‘फलटण तालुक्यामधील शिवसैनिकांची कामे करण्यासाठी व शिवसैनिकांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामे करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे.

फलटण शहर (सातारा) : आगामी काळामध्ये फलटण तालुक्यात शिवसेना वाढीसाठी व पक्ष संघटन बळकट करण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहणार आहे. जनतेची कामे करण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणार असल्याचे प्रतिपादन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

येथे खासगी दौऱ्यानिमित्ताने आलेल्या मंत्री देसाई यांनी येथील शासकीय विश्राम गृहामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी व शिवसैनिकांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. देसाई म्हणाले, ‘‘फलटण तालुक्यामधील शिवसैनिकांची कामे करण्यासाठी व शिवसैनिकांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामे करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. आगामी काळामध्ये फलटण तालुक्यामधील शिवसेनेचे पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहणार आहे. तालुक्यामध्ये शिवसेना बळकट करण्यासाठी आगामी महिन्यामध्ये मी स्वतः फलटणचा दौरा करून शिवसेनेच्या विविध शाखांचे उद्‍घाटन करणार आहे. सर्वसामान्य शिवसैनिकांना पूर्ण ताकद देणार आहे.’’

राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे राज्यातील सर्वच शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. राज्यावर कोरोना, चक्रीवादळ आणि आता महापूर अशी लागोपाठ संकटे आली आहेत. अशा परिस्थितीमध्ये सरकार सर्व संकटांना तोंड देत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राज्यामध्ये विविध कामे प्रगतिपथावर सुरू आहेत. सध्या उद्‍भवलेल्या पूर परिस्थितीमधील नागरिकांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे, असेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT