Shambhuraj Desai esakal
सातारा

विकासासाठी झगडणारा नेता आमच्यातून गेला

रविकांत बेलोशे

भिलार (सातारा) : स्व. बाळासाहेब भिलारे (Balasaheb Bhilare) यांची प्रशासनावरील मजबूत पकड ही विकासाला पूरक अशी होती. जिल्हा परिषदच्या (Zilla Parishad) माध्यमातून डोंगरी विभागात रस्त्यांचे जाळे विणणारा आणि विकासासाठी नेहमी झगडणारा नेता आमच्यातून गेला असल्याचे प्रतिपादन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी केले. स्व. बाळासाहेब भिलारे यांना आदरांजली वाहण्यासाठी भिलार येथे मंत्री देसाई हे आले असता, त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, सभापती संजूबाबा गायकवाड, यशवंत घाडगे, बंडा कुंभारदरे, वाई उपविभागीय पोलिस अधिकारी खराडे-पाटील, राजू अबा भिलारे, प्रवीण भिलारे, जतीन भिलारे, नितीन भिलारे, सुधीर भिलारे, अमित भिलारे, अजित कासुर्डे, नितीन भिलारे आदी उपस्थित होते.

देसाई पुढे म्हणाले, १९९२ सालच्या जिल्हा परिषद टीममध्ये आम्ही सर्वजण एकत्र होतो. सगळ्यांना बरोबर घेवून जिल्ह्यात प्रभावीपणे काम करणारे दादा लोकसंग्रही नेते म्हणूनही परिचित होते. त्यांच्या जाण्याने महाबळेश्वर तालुक्याची अपरिमित, अशी हानी झाल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही जरी वेगळ्या पक्षातून निवडून आलो असलो, तरी दादांनी दिलेल्या अभ्यासपूर्ण यादीवरच आम्ही अगदी विश्वासाने विकास निधी टाकत होतो. हा त्यांच्या आश्वासक कामाचा विचार असल्याचे माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी दादांच्या आठवणी जगावताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bhin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी ! आजपासून खात्यात जमा होणार 'इतके' पैसे

Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा न तळता आख्या हिरव्या मुगाचे वडे, लगेच लिहून घ्या रेसिपी

Sushma Andhare: फलटण महिला डॉक्‍टर आत्‍महत्‍याप्रकरणी चौकशीसाठी उच्‍चस्‍तरीय समिती नेमा: सुषमा अंधारे आक्रमक; पोलिस ठाण्‍यासमोर ठिय्‍या..

Ranajitsinh Nimbalkar: मी नार्को टेस्टला तयार: रणजितसिंह नाईक-निंबाळकर; बदनामीमागे रामराजेच मास्टरमाइंड; स्क्रीनवर नेमकं काय दाखवलं?

सोलापूर शहर पोलिसांचा मोठा निर्णय! चोरट्यांना शहरात येता येणार नाही, आले तर बाहेर जाता येणार नाही; शहरात आता रात्री २१ ठिकाणी ‘सरप्राईज’ नाकाबंदी

SCROLL FOR NEXT