Minister Shambhuraj Desai met MP Udayanraje Bhosale Maratha reservation esakal
सातारा

Shambhuraj Desai : 'मराठा समाजानं शांतता राखावी, अफवांवर विश्वास ठेऊ नये'; उदनराजेंच्या भेटीदरम्यान मंत्री देसाईंचं आवाहन

'मराठा समाजानं शांतता राखावी, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये.'

सकाळ डिजिटल टीम

जालना येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलीस दलानं सतर्क राहावं, तसंच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी.

सातारा : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) शासनाची भूमिका आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणीबाबत माहिती देण्यासाठी मराठा आरक्षण समिती सदस्य या नात्यानं पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची आज भेट घेतली.

यावेळी पालकमंत्री देसाई व खासदार उदयनराजे यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये देसाई यांनी न्यायालयामध्ये सुरू असलेली प्रक्रिया या विषयी माहिती दिली. तसेच आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या सवलतींविषयी सविस्तर माहितीही दिली.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते. दरम्यान, मराठा समाजानं शांतता राखावी, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये व आरक्षणाच्या बाबत शासनास सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री देसाई व खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. जालना येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलीस दलानं सतर्क राहावं, तसंच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही देसाई यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT