Minister Balasaheb Patil esakal
सातारा

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : तारळी धरणासह (Tarli Dam) पाल परिसरात झालेल्या अतिवृष्टीने तारळी नदीला (Tarli river) पूर आला होता. त्या पुराचे पाणी अनेक गावातील घरे, दुकानात शिरल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करावेत, असे आदेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) यांनी दिले. शासन पूरग्रस्तांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाहीही पाटील यांनी यावेळी दिली. (Mirgaon Landslide Minister Balasaheb Patil Order The Government To Compensate The Citizens bam92)

तारळी धरणासह (Tarli Dam) पाल परिसरात झालेल्या अतिवृष्टीने तारळी नदीला (Tarli river) पूर आला होता.

तालुक्यातील पाल येथील पूर परिस्थितीची पाहणी आज पालकमंत्री पाटील यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, पुरामुळे पाल येथील पुलाचे नुकसान झाले आहे. त्याची तत्काळ दुरुस्ती करुन पूल वाहतुकीसाठी खुला करावा.

Balasaheb Patil

पालमध्ये ३५ वर्षात झालेला हा सर्वात मोठा पाऊस आहे. पाटण तालुक्यातील मिरगाव येथे भूस्खलन (Mirgaon landslide) झालेल्या गावात बचावकार्य कोयनेच्या बॅकवॉटरमधून सुरु करण्यात आले आहे. आंबेघर येथे एनडीआरएफची टीम सकाळी पोहोचली असून मदतकार्य सुरु केले आहे. कोयनाधरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. ज्या गावांमध्ये भूस्खलन झाले आहे. त्या गावामध्ये प्रशासनाबरोबर स्वयंसेवी संस्थाही काम करीत आहेत.

Mirgaon Landslide Minister Balasaheb Patil Order The Government To Compensate The Citizens bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT