Devendra Fadnavis Dhangar reservation Jaykumar Gore esakal
सातारा

Satara : शिवतीर्थावरील देसाईंच्या स्मारकाबाबत भाजप आमदाराचं मोठं वक्तव्य; गोरे म्हणाले, सगळ्यांचा सन्मान ठेऊन..

माढा लोकसभा मतदारसंघाच्या कोअर कमिटीची बैठक होणार असल्याची माहिती आमदार गोरे यांनी दिली.

सकाळ डिजिटल टीम

सगळ्यांचा सन्मान ठेऊन स्मारक होणे आवश्‍यक असल्याचे मत आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.

सातारा : समाजातील सर्व घटकांना विचारात घेऊन शिवतीर्थावर लोकनेते बाळासाहेब देसाई (Balasaheb Desai) यांच्या स्मारकाबाबत भूमिका घेणे आवश्‍यक आहे. सगळ्यांचा सन्मान ठेऊन स्मारक होणे आवश्‍यक असल्याचे मत आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) येत्या गुरुवारी (ता. २२) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, बूथ संमेलन, आढावा बैठक, जिहे-कठापूर योजनेच्या (Jihe-Kathapur Scheme) उद्‌घाटनासह विविध कामांचा आढावा घेणार असल्याचे गोरे यांनी सांगितले. शासकीय विश्रामगृह येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, विक्रम पावसकर, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, विकास गोसावी, राहुल शिवनामे आदी उपस्थित होते.

गोरे म्हणाले, ‘‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी (ता. २१) कऱ्हाड येथे मुक्कामी येणार आहेत. २२ तारखेला जिल्ह्याचा दौरा असून, कऱ्हाड येथे टाऊन हॉलमध्ये बूथ अध्यक्षांच्या संमेलनाला मार्गदर्शन करणार आहेत. कऱ्हाड दक्षिणच्या लाभार्थ्यांचा मेळावा होणार असून, या मेळाव्याला जिल्ह्यातील दहा हजार लाभार्थी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघाच्या (Satara Lok Sabha Constituency) कोअर कमिटीची बैठक होणार असून, त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने बैठक होणार आहे.

त्यामध्ये जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजचे काम, एमआयडीसी आदी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्या ठिकाणाहून बरड येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेणार आहेत. सायंकाळी दहिवडी येथे पाणीपुरवठा योजनेचे उद्‌घाटन आणि त्यानंतर सायंकाळी तेथेच जाहीर सभा घेण्यात येणार आहे. त्यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, गोपीचंद पडळकर हे उपस्थित राहणार आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघाच्या कोअर कमिटीची बैठक होणार असल्याची माहिती आमदार गोरे यांनी दिली. दरम्यान, माण तालुक्यातील कोणतेही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही. निश्चितपणाने आंधळी धरणातही पाणी येईल, ३२ गावांसाठीही पाणी योजना असून, त्या माध्यमातून पाणी देणारच, असाही दावा आमदार गोरे यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT