MLA Jaykumar Gore esakal
सातारा

रुग्णांची लूट केल्यास माझ्याशी गाठ; भाजपच्या आमदाराचा खासगी हॉस्पिटल्सना इशारा

कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. बाधितांना सरकारी हॉस्पिटल्समध्ये बेड आणि उपचार मिळेनासे झालेत.

विशाल गुंजवटे

बिजवडी (सातारा) : कोरोनामुळे (Coronavirus) हाहाकार उडाला आहे. बाधितांना सरकारी हॉस्पिटल्समध्ये बेड आणि उपचार मिळेनासे झाले आहेत. हीच संधी साधून खासगी हॉस्पिटसनी (Private Hospitals) भरमसाट बिले आकारून गोरगरिबांची आर्थिक लूट सुरू केली आहे. अधिकाऱ्यांना याबाबत वारंवार सांगूनही कारवाई केली जात नाही. माण, खटाव तालुक्‍यांत यापुढे खासगी हॉस्पिटलांनी नियमबाह्य आणि अवास्तव बिलांची आकारणी केली, तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा आमदार जयकुमार गोरे यांनी दिला. (MLA Jaykumar Gore Warns Private Hospitals Satara News)

अत्यवस्थ रुग्णांना नाइलाजाने खासगी हॉस्पिटल्सचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, सध्याच्या विदारक परिस्थितीचा फायदा उचलण्यासाठी खासगी हॉस्पिटल्स मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्यात व्यस्त झाले आहेत.

गोरे पुढे म्हणाले, "सध्या कोरोनामुळे सर्व शासकीय रुग्णालये, कोरोना उपचार केंद्रे, आयसोलेशन कक्ष क्षमतेपेक्षा अधिक भरले आहेत. बाधितांना बेड मिळणे मुश्‍कील झाले आहे. अत्यवस्थ रुग्णांना नाइलाजाने खासगी हॉस्पिटल्सचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, सध्याच्या विदारक परिस्थितीचा फायदा उचलण्यासाठी खासगी हॉस्पिटल्स मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्यात व्यस्त झाले आहेत. गोरगरीब रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा लाखोंची बिले उकळली जात आहेत. वास्तविक, शासकीय नियमाप्रमाणे खासगी रुग्णालयांना सर्वसाधारण वॉर्ड आणि आयसोलेशनसाठी दिवसाला चार हजार, व्हेंटेलेटरविना आयसीयू आयसोलेशनसाठी दिवसाला 7500, तर व्हेंटेलेटरसह आयसीयू आयसोलेशनसाठी दिवसाला जास्तीतजास्त 9000 हजार रुपये दर आकारण्याची परवानगी देण्यात आली आहे.

यामध्ये रुग्ण तपासणी, मॉनिटरिंग, सीबीसी, लघवी तपासणी, एचआयव्ही, एचसीव्ही, एचबीएस एजी, क्रियाटिनीन, युएसजी, टु डी इको, एक्‍सरे, ईसीजी या तपासण्या, बेड आणि नर्सिंग चार्जेस, रुग्णाचे जेवण आणि इतर काही वैद्यकीय क्रियांचा समावेश करण्यात आला आहे.'' खासगी रुग्णालये रुग्णाला भरती करून घेतानाच लाखो रुपये आगाऊ घेत आहेत. पैसे घेऊन बेड मिळवून देण्यासाठी एजंट नेमण्यात आले आहेत. रुग्णाला व्हेंटिलेटर लावला की नाही, कोणते उपचार केले याचा थांगपत्ता लागू न देता कित्येक पट अधिक बिलांची आकारणी केली जात आहे. खासगी रुग्णालयांच्या लाखोंच्या बिल आकारणीमुळे कित्येक रुग्ण अत्यवस्थ अवस्थेतही घरातच थांबत आहेत. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांचे त्यामध्ये मृत्यू होत आहेत, असे त्यांनी सांगितले.

MLA Jaykumar Gore Warns Private Hospitals Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: 'सीएम'पदासाठी भाजपात पक्ष विलिन करण्याची शिंदेंची तयारी - संजय राऊतांचा टोला!

IND vs ENG 3rd Test: रिषभ पंतने २५ मिनिटं नेट्समध्ये फलंदाजी केली, पण...! जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स, Video

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

SCROLL FOR NEXT