सातारा

कार्वे पुलाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, माजी मुख्यमंत्र्यांच्या प्राधिकरणला सूचना

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाड-तासगाव राज्य महामार्गावरील 60 वर्षे जुना कृष्णा नदीवरील कार्वे पूल भविष्यातील गरज ओळखून त्याच पुलाशेजारी नवीन पूल बांधणे ही काळाची गरज आहे. राज्य महामार्ग विभागाने पूल बांधण्याच्या संदर्भात एक अहवाल करून नवीन पुलाची तत्काळ कार्यवाही सुरू करावी, असे आदेश माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. 

पुलासंदर्भात झालेल्या बैठकीस प्रांताधिकारी उत्तम दिघे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सांगावकर, मलकापूरचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण, कऱ्हाड दक्षिण युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष वैभव थोरात, भगवान सुतार, संभाजी थोरात, नारायण थोरात, ग्रामसेवक पवार, अमर शिंदे, विकास घाडगे, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कऱ्हाड -तासगाव महामार्गावरील कार्वे पूल 60 वर्षे जुना आहे. या पुलावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील काही वर्षांपासून पावसामुळे व वाढत्या वाहतुकीमुळे पूल खचत चालला असून, वाहतुकीस असुरक्षित झाला आहे. 

आमदार चव्हाण यांनी कार्वे पुलाची प्रत्यक्ष पाहणी करून तत्काळ सर्व खड्डे भरून नवीन रस्ता बनविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर रस्ता दुरुस्त करण्यात आला. वाढती वाहतूक विचारात घेऊन नवीन पुलाची गरज आहे. पुलाच्या बांधणीत येणाऱ्या स्मशानभूमीला पर्यायी जागा देऊन नवीन स्मशानभूमी संबंधित विभागाने बांधून द्यावी. ज्यांची घरे व जागा या पुलामध्ये जातील अशा बाधितांनाही नुकसान भरपाई तत्काळ द्यावी, असे आदेशही आमदार चव्हाण यांनी राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांना दिले. प्रशासनाने त्यामध्ये लक्ष घालावे, अशा सूचना प्रांताधिकाऱ्यांना दिल्या. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: पुनरागमन करताच मॅक्सवेलचा गुजरातला मोठा दणका! कर्णधार शुभमन गिलला धाडलं माघारी

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : माढा येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटीलांचा भाजपा उमेदवाराला पाठिंबा

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT