MLA Shashikant Shinde esakal
सातारा

प्रतापगड सुरू न झाल्यास टाळे तोडू; आमदार शिंदेंचा गर्भित इशारा

महेश बारटक्के

कुडाळ (सातारा) : जावळीच्या हक्काचा प्रतापगड साखर कारखाना (Pratapgad Sugar Factory) दुर्देवाने बंद पडला म्हणून तो किसनवीर कारखान्यास (Kisanveer Sugar Factory) चालवण्यास दिला. १६ वर्षांच्या कराराने चालवण्यास दिलेला कारखाना गेल्या तीन हंगामापासून बंद ठेवण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रतापगड कारखाना सुरू झाला पाहिजे. जर चालवायचा नसेल तर माझी तयारी आहे. सर्व जावलीकर उस उत्पादकांना घेऊन या कारखान्याचे टाळे तोडू, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी दिला. दरम्यान, कारखान्याचे संचालक सौरभ शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून जावलीचा कारखाना पूर्वीच्या संचालक मंडळाच्या ताब्यात द्यावा, असेही त्यांनी नमूद केले. (MLA Shashikant Shinde Demand Government To Start Pratapgad Sugar Factory bam92)

प्रतापगड कारखाना बंद असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आणि म्हणून उस उत्पादकाला इतरांच्या पुढे हात पसरण्याची वेळ आलीय.

कुडाळ (ता. जावळी) येथे जरंडेश्वर कारखाना (Jarandeshwar Sugar Factory) बचावासाठी जावळी तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. भविष्यात महू हातगेघर, बोंडारवाडी धरणाची (Bondarwadi Dam) प्रक्रिया पूर्ण झाल्यास मोठ्या प्रमाणावर जावळीत उस वाढणार आहे. सध्या दिड लाख मेट्रीक टनाचे ऊस उत्पादन जावळी तालुक्यात होते, असे नमूद करुन श्री. शिंदे म्हणाले, ‘प्रतापगड कारखाना बंद असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आणि म्हणून उस उत्पादकाला इतरांच्या पुढे हात पसरण्याची वेळ आलीय. यंदा तरी किसनवीर व प्रतापगड सुरू होईल का याबाबत साशंकता आहे. सलग तीन हंगाम कारखाना बंद राहिल्याने येथील शेतकरी अडचणीत आला आहे. मात्र, किसनवीर प्रशासनाला त्याचे सोयरसुतक वाटत नाही. कारखाना चालवायला दिला म्हणून त्यांनी तीन वर्ष टाळा लावाला, हे चालणार नाही. सहनशीलतेचा अंत झाला तर कारखान्याचे टाळे तोडल्याशिवाय राहणार नाही.’’

Shashikant Shinde

लढाई कोणी तरी केली पाहिजे, सातारा जिल्ह्यामध्ये लढण्याची भूमिका फक्त शशिकांत शिंदेच घेऊ शकतो. मी परिणामांचा विचार करत नाही. जिल्ह्याच्या प्रगतीचा विचार करतो. जरंडेश्वर कारखाना बंद झाला तर हजारो शेतकरी ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान होईल, म्हणूनच ही लढाई आहे, ही लढाई एकट्याने करून चालणार नाही, ती सर्वांना करावी लागेल, असेही श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले. जावळीतील उसासाठी जरंडेश्वरच्या जास्तीत-जास्त तोडणी यंत्रणा उभी करून येथील उस शिल्लक राहणार याची जबाबदारी घेतो, अशी हमी त्यांनी दिली. राजकारणासाठी ईडीने जरंडेश्‍वरवर कारवाई करू नये, अन्यथा आंदोलनाच्या माध्यमातून जिल्ह्याची ताकद ईडीला (ED Action On Jarandeshwar Factory) दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे अनेक ज्येष्ट, पदाधिकारी तसेच युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

MLA Shashikant Shinde Demand Government To Start Pratapgad Sugar Factory bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT