Udayanraje Bhosale esakal
सातारा

'त्यांना'च शिव्या देतात अन् त्यांच्याशी चर्चा करायला जातात : शिवेंद्रसिंहराजे

पाटीवर नाव लावण्यासाठी बॅंकेच्या संचालकपदावर नको : शिवेंद्रसिंहराजे

उमेश बांबरे

आपण छत्रपतींच्या घराण्यातील असून आपण त्यांना शिव्या देतो आणि त्यांच्याशी चर्चा करायला जातो.

सातारा : सभापती रामराजेंना आमनेसामने या, असे म्हणणारे त्यांच्याशीच जिल्हा बँकेच्या निवडणुकीविषयी चर्चा करायला जातात. आपण छत्रपतींच्या घराण्यातील. आपण त्यांनाच शिव्या देतात आणि त्यांच्याशी चर्चा करायला जातात, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांनी खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांना जिल्हा बँकेबाबत विचारलेल्या प्रश्नावरून लगावला. सातारा जिल्हा बँकेत योगदान दिलंय त्यांनीच या बँकेवर काम करावे. केवळ पाटीवर नाव लावण्यासाठी बँकेच्या संचालक पदावर येऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर (Speaker Ramraje Nimbalkar) यांनी उदयनराजेंना जिल्हा बँकेवर घेण्याबाबतचा निर्णय तुमच्यावर ढकलला आहे, याविषयी विचारले असता शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘यासंदर्भात माझ्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. उदयनराजेंकडूनही मला तशी विचारणा झालेली नाही. जिल्हा बँक पक्षविरहित राहावी, यासाठी आमचा प्रयत्न आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात बँकेची तिप्पट प्रगती झालेली आहे. आम्ही जरी सगळे संचालक विविध पक्षांत असलो, तरी आमच्यात समन्वय असून, आम्ही बँकेच्या प्रगतीसाठी झटत आहोत. मात्र, काही जण केवळ नावामागे जिल्हा बँक संचालक अशी पाटी लावण्यासाठी बँकेचे संचालक होण्याची इच्छा व्यक्त करतात. मुळात जिल्हा बँकेत येऊन बँकेसाठी योगदान देणाऱ्यांनी संचालक म्हणून यावे.’’

Ramraje Nimbalkar

सभापती रामराजेंना आमनेसामने या, असे म्हणणारे त्यांच्याशी जिल्हा बँकेच्या निवडणुकीविषयी चर्चा करायला जातात. आपण छत्रपतींच्या घराण्यातील असून आपण त्यांना शिव्या देतो आणि त्यांच्याशी चर्चा करायला जातो. आता माझे हे म्हणणे ऐकल्यावर तर ते चर्चेला येऊच शकणार नाहीत, असेही ते म्हणाले.

उदयनराजेंचा निर्णय पुन्हा रामराजेंकडे

उदयनराजेंकडून चर्चेसाठी विचारणा झाल्यास तुम्ही काय भूमिका घेणार यावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, की मी निर्णय घेणारा कोण. सर्व काही रामराजे निंबाळकर ठरवितात. त्यांनीच निर्णय घ्यावा, असे सांगून शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंच्या निर्णयाचा चेंडू पुन्हा रामराजेंच्या कोर्टात ढकलला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik: रिक्षा चालकांनी मदत नाकारली, आईच्या खांद्यावर लेकराने जीव सोडला; भाजपचा पदाधिकारी धावला, पण..

Solapur AkashKandil: कागदी आणि प्लास्टिक कंदील विसरा! सोलापुरात मिळतोय खास मातीचा आकाश कंदील, जाणून घ्या किंमत किती?

OMG! फक्त ५ लाखांची लोकसंख्या असलेला देश खेळणार FIFA फुटबॉल वर्ल्ड कप

Passenger bus caught fire : भीषण दुर्घटना! प्रवाशांनी भरलेली बस पेटली; लहान मुलं, महिलांसह १५ जणांचा मृत्यू

Thane News: परप्रांतीयांची मुजोरी वाढली! दिवाळीचा स्टॉल लावण्यावरून वाद पेटला, अमराठी महिलांचं मराठी महिलांसोबत नको ते कृत्य

SCROLL FOR NEXT