Shivendrasinharaje Bhosale esakal
सातारा

उदयनराजेंना दिवाळीचा 'गोडवा' हवा, की आणखी काही : शिवेंद्रसिंहराजे

उमेश बांबरे

उदयनराजेंना पॅनेलमध्ये घ्यायचे का नाही, याचा अधिकार मला नाही.

सातारा : जरंडेश्वरला (Jarandeshwar Sugar Factory) कर्ज देताना संचालक मंडळाच्या बैठकीत खासदारांची तिसऱ्या क्रमांकावर सही आहे. चुकीचे कर्ज असते तर त्यांनी विरोध का केला नाही. आता बँकेबद्दल (Satara Bank Election 2021) चुकीची माहिती पसरवत आहेत. कोण कोणाची जिरवायला जात नाही. ज्यांच्या मागे मतदार नाहीत, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागेल, म्हणून त्यांनी बँकेला बदनाम करू नये. माझ्यासह सर्व संचालकांना दिवाळी गोड जावी, असे मलाही वाटते; पण उदयनराजेंना दिवाळीचा (Diwali Festival) गोडवा हवा, की अन्य काही हे त्यांचे त्यांनीच ठरवावे, असा खोचक टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांनी उदयनराजेंना (MP Udayanraje Bhosale) लगावला आहे.

बॅंकेबद्दल चुकीची माहिती देऊन सभासद व जनतेत बदनामी करू नका, असा सल्लाही देऊन ते म्हणाले, ‘‘बॅंकेबाबत खासदार चुकीची माहिती मांडत आहेत. सर्वसमावेश पॅनेलचा निर्णय जिल्ह्यातील नेते एकत्र बसून घेणार आहेत. बँकेची ईडीकडून (ED Notice) कोणतीही चौकशी सुरू नाही. ईडीने जरंडेश्वर कारखान्याच्या कर्ज प्रकरणाची माहिती मागितली होती. ती आम्ही संचालक मंडळाच्या बैठकीत ठेऊन दिलेली आहे. खासदार साहेब या बैठकीला गैरहजर होते. ते उपस्थित राहिले असते तर त्यांना माहिती मिळाली असती. त्यांनी मागितलेली माहिती मिळणार असून, कायदेशीर सल्लागाराला विचारूनच आम्ही माहिती देणार आहोत.’’ सर्व समावेशक पॅनेलमध्ये डावलले जातेय म्हणून उदयनराजे आरोप करतात का, यावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘आजपर्यंत पक्ष म्हणून कोणीही बँकेची निवडणूक लढविली नाही. यावेळेसही पक्षविरहित पॅनेल आहे. त्यांना पॅनेलमध्ये घ्यायचे का नाही, याचा अधिकार मला नाही. त्यातून त्यांनी बँकेबद्दल चुकीची माहिती जिल्ह्यात आणि सभासदांपुढे पसरवू नये.’’

निवडणूक निवडणुकीच्या मार्गाने होऊ देत. ज्यांच्या मागे मतदार नाहीत. त्यांना पराभवाला सामोरे जावे लागेल, म्हणून बँकेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. आजपर्यंत जिल्हा बँकेच्या संचालकांच्या ८२ बैठका झाल्या. त्यापैकी ६३ बैठकांना उदयनराजेंनी उपस्थित न राहता रजा घेतली होती. माझ्यासह सर्व संचालकांना दिवाळी गोड जावी, असे मला वाटते; पण जिल्हा बँकेच्या या निवडणुकीच्या निमित्ताने उदयनराजेंना दिवाळीचा गोडवा हवा, की अन्य काही.. हे त्यांचे त्यांनी ठरवावे, असेही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

चुकीचे सल्ले कोण देते...

उदयनराजेंना असे चुकीचे सल्ले कोण देते, या प्रश्नावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘त्यांचे मार्गदर्शक समर्थक त्यांना चुकीचे सल्ले देत असतील. मुळात आपल्या सोबत सातत्याने राहणाऱ्या कार्यकर्त्यांचे किती ऐकावे, हे ज्याचे त्यांनी ठरवावे.’’ गोडोलीतील की भरतगावच्या सल्लागाराने त्यांना चुकीचा सल्ला दिला, याविषयी विचारले असता शिवेंद्रसिंहराजेंनी मला खरोखरच याची माहिती घ्यावी लागणार आहे, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT