सातारा

जिल्हा रुग्णालयात उपचार सुविधा त्वरित सुरु करा : आमदार शिवेंद्रसिंहराजे

Balkrishna Madhale

सातारा : गेल्या सात-आठ महिन्यांपासून कोरोना या साथीच्या आजारामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना साथीचा फैलाव सुरु असल्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयात केवळ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. वास्तविक पाहता जिल्हा रुग्णालय हे जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांची आरोग्यवाहिनी आहे. मात्र, कोरोनामुळे जिल्हा रुग्णालयात ह्रदयविकार, डायलेसिस, मधुमेह, सर्पदंश, जळीतग्रस्त, महिलांची प्रसुती यासह इतर सर्व आजारातील गंभीर रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार होवू शकत नाहीत. त्यामुळे अशा हजारो रुग्णांचे हाल होत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून जम्बो कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांना सर्व सोयीनीयुक्त जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी हलवावे आणि जिल्हा रुग्णालयात पूर्वीप्रमाणे इतर सर्व आजारातील रुग्णांवर उपचार सुरु करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, गेल्या सात-आठ महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर प्रशासनाने विविध उपाययोजना सुरु केल्या. जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी १५८ बेड तयार करण्यात आले. त्यामध्ये आयसीयूमधील २० बेडचाही समावेश आहे. जिल्हा रुग्णालय हे संपूर्ण जिल्ह्याची आरोग्यवाहिनी आहे आणि या रुग्णालयात दररोज हजारो रुग्णांची तपासणी आणि उपचार सुरु असतात. जिल्ह्यातील गोर, गरीब लोकांना खासगी हॉस्पिटल्सचा खर्च परवडत नसल्याने विविध प्रकारच्या आजारांसाठी जिल्हा रुग्णालयाचाच आधार असतो. मात्र, कोरोनामुळे जिल्हा रुग्णालयात इतर रुग्णांवर उपचार बंद झाले. ह्रदयविकार, डायलेसिस, सर्पदंश, भाजलेले रुग्ण, गरोदर स्त्रीयांची प्रसुती यासह इतर सर्व प्रकारचे गंभीर आजारी रुग्णांना गेल्या आठ महिन्यांपासून उपचाराविना रहावे लागत आहे आणि त्यांचे अतोनात हाल होत आहेत.

जिल्हा प्रशासनाने जम्बो कोविड केअर सेंटर उभारले असून त्याचे नुकतेच उदघाटन झाले आहे. येत्या सोमवारपासून हे सेंटर सुरु होणार आहे. या सेंटरमध्ये ५० बेड व्हेंटिलेटरयुक्त तर २५० बेड ऑक्सिजनच्या सुविधायुक्त असून या सेंटरमध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. या सेंटरसाठी वैद्यकीय स्टाफही नियुक्त असून त्यांना वेतनही चालू राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांप्रमाणेच इतर सर्व प्रकारच्या व्याधीने गंभीर आजारी गोरगरीब रुग्णांना तातडीने उपचार मिळणे आवश्यक आहे. जिल्हा रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांना जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी हलवल्यास त्यांना या सेंटरमध्ये दर्जेदार सुविधा उपलब्ध होईल आणि त्यांच्यावर चांगले उपचार होतील आणि तसे झाल्यास जिल्हा रुग्णालयात पूर्वीप्रमाणे इतर व्याधीग्रस्त रुग्णांना उपचार मिळणे सोपे होईल. त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय घेवून कोरोनाबाधितांना जम्बो कोविड सेंटरमध्ये हलवण्यात यावे आणि उपचारापासून वंचित असलेल्या इतर रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करुन त्यांचे हाल थांबवावेत, अशी आग्रही मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

https://www.facebook.com/ChhShivendraRajeBhonsale/posts/3602050703191667

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : आजारपणानंतर संजय राऊत पहिल्यांदाच माध्यमांसमोर; महायुतीवर जोरदार टीका, काँग्रेसला लगावला टोला, प्रकृतीबाबतही दिली अपडेट

Viral Video: चार वर्षांच्या बालिकेला सेविकेची मारहाण, जमिनीवर आपटले अन्... व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल

Kolhapur Crime : लग्न सोहळ्यासाठी आलेल्या 7 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; कात्यायनी मंदिर परिसरात उसाच्या शेतात नेऊन...

टीव्हीवरचे बहिण-भाऊ खऱ्या आयुष्यात झाले नवरा बायको! मराठी अभिनेता अडकला लग्नबंधनात, फोटो चर्चेत

PM Narendra Modi : पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा अन् रणनीती बदला, मी मार्गदर्शन करतो; पंतप्रधान मोदींचे विरोधकांना आवाहन

SCROLL FOR NEXT