Udayanraje Bhosale esakal
सातारा

महाराजांना Petrol परवडत नाही, मग BMW कशावर चालवणार?

उदयनराजे, तुम्ही लोळत जा किंवा चालत; पण नगरपालिकेला लोळवू नका

उमेश बांबरे

खासदार साहेबांनी आज सांगितलं की, मला पेट्रोल परवडत नाही, म्हणून मी दुचाकीवरून गेलो.

सातारा : खासदार साहेबांना एकीकडे पेट्रोल परवडत नाही म्हणत असताना एक कोटींची नवीन बीएमडब्ल्यू घेतल्याचे सोशल मीडियावरून दिसून आले. हे त्यांचे सूत्रच कळंना झालंय. ही नवी बीएमडब्ल्यू (BMW Car) कशावर चालविणार असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी चालत जायचं, की लोळत जायचं हे त्यांचं त्यांनी ठरवावं. पण, सातारा पालिकेला लोळवण्याचा प्रयत्न करू नका, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांनी खासदार उदयनराजेंना (MP Udayanraje Bhosale) लगावलाय.

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सकाळी प्रतापगडावरून (Pratapgad Fort Mahabaleshwar) आमदार शिवेंद्रसिंहराजेंवर टीकेची तोफ डागली होती. त्या तोफेला त्यांच्याच स्टाइलने आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी प्रतिउत्तर दिलंय. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा पालिकेच्या विषयावरून आठवडाभरापासून जे काही उद्‌घाटने, पोस्टरबाजी चालली होती. दुचाकीवरून उद्‌घाटनाला जाण्यावरून मी माझे मत व्यक्त केलं होतं. ही सगळी शोभा नौटंकी आहे, या मतावर मी आजही ठाम आहे.

खासदार साहेबांनी आज सांगितलं की, मला पेट्रोल परवडत नाही, म्हणून मी दुचाकीवरून गेलो. आम्हालाही ही बाब शॉकिंग आहे की, महाराजांना पेट्रोल परवडत नाही. तसेच ते म्हणाले की, त्याला कॉमनसेन्स लागतो. तो कॉमन नसतो. मला कॉमनसेन्स कमी असेल, असे त्यांचे म्हणणे असेल. पण पेट्रोल परवत नाही असे म्हणतानाच कालच त्यांच्या ताफ्यात एक कोटींची बीएमडब्ल्यू आल्याचे सोशल मीडियावर पहायला मिळाली. याचे सूत्रच कळंना झालंय.ही बीएमडब्ल्यू कशावर चालवणार तुम्हाला पेट्रोल परवडत नसेल तर, असा प्रश्न शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित केलाय. खासदार साहेबांनी चालत जायचं, की लोळत जायचं, हे त्यांनी कसे करायचं तसं करा, पण नगरपालिकेला लोळवण्याचा प्रयत्न करू नका, असा सल्लाही त्यांनी उदयनराजेंना दिलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT