satara sakal
सातारा

माथाडी चळवळीला मोदी सरकार देशभर नेणार : देवेंद्र फडणवीस

माथाडी चळवळ फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादीत न ठेवता ती भारतभर नेण्यासाठी मोदी सरकार त्यावर काम करत आहे.

राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : माथाडी चळवळ फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादीत न ठेवता ती भारतभर नेण्यासाठी मोदी सरकार त्यावर काम करत आहे. अण्णासाहेब पाटील यांनी लावलेल्या रोपट्याचा त्यामुळे वटवृक्ष होवून देशभरातील कष्टकऱ्यांना त्याची सावली मिळेल'. असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनतर्फे माथाडी हॉस्पीटलच्या माध्यमातून नवीमुंबईत माथाडी भवन येथे माथाडी कामगारांसाठीच्या मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाचा प्रारंभ आज झाला, त्या प्रसंगी ते बोलत होते.

ते म्हणाले माथाडी कामगारांचे लसीकरण प्राधान्याने होण्यासाठी नरेंद्रपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनतर्फे राबविला जाणारा मोफत लसीकरणाचा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'कोरोना मुक्त भारत'साठीच्या ऐतिहासिक कार्याला चालना देणारा आहे. कोरोनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला मात्र त्याही परिस्थितीत केंद्र शासनाने व्यापार व उद्योग जगवण्याचा व सावरण्याचा प्रयत्न केला. एवढ्या मोठ्या देशात लसीकरण कार्यक्रम राबवणे अवघड होते परंतु भारताने स्वतःच्या चार लसी तयार केल्याने आपले इतर देशांवरील अवलंबित्व संपले.आजपर्यंत देशातील ७० कोटी जनतेचे लसीकरण झाले आहे. दररोज ७० लाख लोकांचे लसीकरण होत असून, येत्या डिसेंबरपर्यंत देशातील बहुतांश जनतेचे लसीकरण होऊन देश कोरानातून बाहेर निघेल.पद असो किंवा नसो सकारात्मकदृष्टीने सतत काम केले तर लोकांच्या जीवनात आपण परिवर्तन घडवू शकतो यावर माझा विश्वास आहे.

दरम्यान अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनला लसीचे २० हजार डोस व एक रुग्णवाहिका देणार असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले. आमदार गणेश नाईक, आमदार शशिकांत शिंदे, आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, नवीमुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, नगरसेविका शुभांगी पाटील, अॅड्. भारतीताई पाटील, माथाडी युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड, उपाध्यक्ष सुर्यकांत पाटील, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. हणमंतराव पाटील, व्यापारी प्रतिनिधी संजय पानसरे, मोहन गुरनानी, शंकरराव पिंगळे आदी उपस्थित होते.फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. लसीकरण केलेल्या कामगारांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT