Koyna Dam esakal
सातारा

Koyna Dam Update : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कोयना धरण क्षेत्रात पावसाची 'अशी' आहे स्थिती, पूर्व भागातही जोर कायम

कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे सर्वात जास्त ४९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पाटण : कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. पूर्व भागातही पावसाच्या सरी येऊ लागल्या होत्या. त्यामुळे खरीप पिकांच्या (Kharif crop) आंतर मशागतीच्या कामात आज अडथळा निर्माण झाला आहे.

पावसाचा (Rain Update) वाढलेला जोर पश्चिम भागातील भात व नाचणी पुनर्लागणीच्या कामासाठी उपयुक्त असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. काल सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे.

गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे सर्वात जास्त ४९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला ४४ मिलिमीटर आणि महाबळेश्वरला ३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, धरणाची पाणीपातळी २०६५.०४ फूट झाली आहे.

पावसाचा जोर वाढल्याने जलाशयात होणारी पाण्याची आवक वाढली असून, प्रतिसेकंद चार हजार ९०१ क्युसेक होत आहे. जलाशयाचा एकूण पाणीसाठा २४.४६ टीएमसी झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT