Mother-Child
Mother-Child  esakal
सातारा

हृदयद्रावक! तान्हुल्याला पोटाला बांधून आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : मावशीकडे आलेल्या विवाहितेने तीच्या अवघ्या आठ महिन्याच्या मुलासह आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना आज उघडकीस आली. कासारशिरंबे (ता. कऱ्हाड) येथे पालकराचा मळा नावाच्या शिवारात (Farm) घटना घडली. राजश्री शंकर रासकर (वय २३) व तीचा मुलगा शिवतेज (वय आठ) अशी दोघांची नावे आहेत. तीचे सासर कडेगाव (रा. कडेगाव जि. सांगली) तर माहेर नेर्ले (ता. वाळवा) आहे. काल ती सासरहून दवाखान्यात (Hospital) जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली. ती थेट मावशीच्या गावी कासारशिंरबे येथे आली. त्यावेळी ती मावशीकडे न जाता तीने लहान बाळासह आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. लहान बाळाला रुमालाने (स्टोल) पोटाला बांधून तीने विहिरीत (Well) उडी मारून जीवनयात्रा संपवली. (Mother Jumped In Well Along With Child Kadegoan Karad Walva Satara News)

मावशीकडे आलेल्या विवाहितेने तीच्या अवघ्या आठ महिन्याच्या मुलासह आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना आज उघडकीस आली.

सकाळी रानात जाणाऱ्या नागरिकांना विहिरीच्या काठावर पिशवी दिसली. त्यांना शंका आल्याने त्यांनी विहिरीत पाहिल्यानंतर त्यात दोघांचा मृतदेह दिसला. त्वरित त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ओळख पटल्यानंतर खळबळ उडाली. त्याबाबत राजश्री यांच्या मावशी वनिता दगडे (काटकर मळा, कासारशिरंबे) यांनी पोलिसांत खबर दिली आहे. पोलिसांनी (Police) सांगितले की, वनिता व त्यांचे पती बबन मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास त्यांच्या पालकराचा मळा नावाच्या शिवारात जनावरांना चारा आणण्यास निघाले होते. संतोष पाटील यांच्या विहिरीकडे जाणाऱ्या पाऊलवाटेवर लहान मुलाची दुधाची बाटली व दुपटे पडलेले त्यांना दिसले. शंका आल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले. त्यावेळी विहिरीत महिलेसह मुलाचा मृतदेह दिसला. घटनेची माहिती मिळताच पोलीस व ग्रामस्थ घटनास्थळी आले. मृतदेह विहिरीतून बाहेर काढले.

मृतदेह बाहेर काढल्यानंतर महिलेने तोंडाला बांधण्यास वापरत असलेल्या स्टोलने (मोठा रुमाल) मुलास पोटाला बांधल्याचे दिसल्यानंतर पोलिसही हेलावले. त्यावेळी वनिता दगडे यांनी मृत महिला ही आपली भाची राजश्री रासकर असल्याची ओळख पटवली. तीच्या पोटाला बांधलेला मुलगा शिवतेज असल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, उपनिरीक्षक राजू डांगे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोचले. पोलिसांनी पंचनामा करुन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. दुपारी पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. राजश्रीचे माहेर नेर्ले (ता.वाळवा) तर कडेगाव (जि. सांगली) सासर आहे. राजश्रीचे बालपण मावशीच्या कासारशिरंबे येथे गेले आहे. तीचे प्राथमिक शिक्षण येथेच झाले आहे. दोन वर्षापूर्वी तिचा विवाह झाला होता. तिच्यावर दवाखान्यात उपचार सुरू होते. सोमवारी सकाळी दवाखान्यात जाते असे सांगून कडेगाव येथून ती निघून आली होती. परंतु, दवाखान्यात न जाता ती सायंकाळी कासारशिरंबे येथे पोचली. मावशीकडेही न जाता थेट तीने आत्महत्येचा मार्ग धरला. पोटच्या आठ महिन्याचा मुलालाही पोटाला बांधून तीने विहिरीत उडी घेतली. त्यात दोघांचाही मृत्यू झाला आहे. फौजदार राजू डांगे तपास करत आहेत.

अन् पोलिसांनाही अश्रु अनावर..

एरव्ही प्रवासात वापरला जाणारा स्टोल राजश्रीने मुलाला पोटाला बांधण्यासाठी वापरला होता. काल सायंकाळी दुर्घटना घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे आज दुपारनंतर मुलगा शिवतेज व आई राजश्री यांची मिठी सोडविताना पोलिसांना फारच कसरत करावी लागली. मिठी घट्ट असल्याने आईपासून मुलाला बाजूला काढताना पोलिसांसह उपस्थितांची मने हेलावली. त्यांच्या डोळ्याच्या कडाही पाणावल्या.

Mother Jumped In Well Along With Child Kadegoan Karad Walva Satara News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT