Udayanraje Bhosale esakal
सातारा

निवडणुकीवर 'पैसा' खर्च करण्यापेक्षा निवडणुका 'बिनविरोध' करा

उमेश बांबरे

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुका (Satara Bank Election) जाहीर होताच जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले असून उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी नेत्यांकडून लगबग सुरु आहे. दरम्यान, निवडणुकीबाबत जिल्हा बँकेचे संचालक व खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनीही आपली भूमिका मांडली असून ते म्हणाले, की निवडणूक लावून खर्च करण्यापेक्षा निवडणुकीचा पैसा शेतकरी सभासदांसाठी वापरला तर त्यांना चांगला फायदा होईल, तसेच बँक व्यवस्थित चाललेली असताना बँकेला 'ईडी' नोटीस (ED Notice) का पाठविण्यात आली?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुका जाहीर होताच जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज अचानक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेआधी बँकेच्या मुख्य कार्यालयात उपस्थिती लावली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लागली असून त्या अनुषंगाने त्यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी बँकेच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले. तसेच बँकची निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे.

उदयनराजे म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीशी माझा काही संबंध नाही. पण, बँकेची निवडणूक लावून खर्च करण्यापेक्षा निवडणुकीचा पैसा सभासदांसाठी वापरला तर सभासदांचा फायदा होईल, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच बँक व्यवस्थित चालली असताना बँकेला 'ईडी'ची नोटीस का पाठविण्यात आली, असा मुद्दाही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT