MP Udayanraje Bhosale Vishalgad esakal
सातारा

उद्या गडावर जाऊन, कोणीही फाईव्हस्टार हॉटेल बांधेल; विशाळगडावरुन उदयनराजेंचा अतिक्रमणधारकांना स्पष्ट इशारा

वर्षानुवर्षे गडावर जे गडकरी आहेत, त्यांची घरे सोडली तर कोणीही तेथे अतिक्रमण करू नये.

हेमंत पवार

''जे गडावर राहणारे गडकरी आहेत ते सोडले तर बाकींच्याचा गडावर अतिक्रमण करण्याचा अधिकारच काय?''

कऱ्हाड : विशाळगडासंदर्भात (Vishalgad Controversy) काय घडले, काय घडले नाही यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) जेवढे गड-किल्ले आहेत तेथे अतिक्रमण होता कामा नये, असे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी येथे व्यक्त केले. त्‍याचबरोबर अतिक्रमण करणाऱ्यांची कानउघाडणीही केली.

कऱ्हाडमधील पाणीपुरवठ्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी खासदार भोसले येथे आले होते. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी आमदार आनंदराव पाटील, माजी ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, पालिकचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र यादव, सुनील काटकर, माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, हणमंत पवार, स्मिता हुलवान, विजय यादव, मुकुंद चरेगावकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार भोसले म्हणाले, ‘‘विशाळगडासंदर्भात काय घडले, काय घडले नाही यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे गड-किल्ले आहेत तेथे अतिक्रमण होता कामा नये. वर्षानुवर्षे गडावर जे गडकरी आहेत, त्यांची घरे सोडली तर कोणीही तेथे अतिक्रमण करू नये. उद्या गडावर जाऊन, कोणीही फाईव्हस्टार हॉटेल बांधेल. त्यामुळे त्याचे पावित्र्य राहात नाही.’’

गड- किल्ले हे सर्व पुरातत्त्व खात्याच्या अंतर्गत येतात. पुरातत्त्व खाते हे अवैध बांधकामाला परवानगी देणार नाही. मात्र, जे गडावर राहणारे गडकरी आहेत ते सोडले तर बाकींच्याचा गडावर अतिक्रमण करण्याचा अधिकारच काय? त्यांनी तेथे अतिक्रमण करूच नये, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त करून अतिक्रमण करणाऱ्यांची कानउघाडणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT