Udayanraje Bhosale esakal
सातारा

'तुम्हाला बघितल्यानंतर पारणंच फिटतं', भर मंचावर उदयनराजेंच्या डोळ्यात पाणी

सकाळ डिजिटल टीम

वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

सातारा : वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शहरातील वॉर्डामध्ये विकासकामांच्या निमित्तानं उदयनराजेंचा जोरदार राबता सुरूय. सातारा नगर पालिकेच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन खासदार उदयनराजे यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. मात्र, या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान बोलताना खासदार उदयनराजे भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

सातारकर आणि कार्यकर्त्यांचं आभार मानत असताना उदयनराजेंना आपले अश्रू रोखते आले नाही, ते व्यासपीठावरच सातारकरांना 'ऑलवेज देअर फॉर यू' म्हणत माझ्यावर जीव लावणाऱ्यांची मी कशी परतफेड करु? असं म्हणत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. त्यामुळं संपूर्ण वातावरण भावनिक झालेलं बघायला मिळालं. उदयनराजे पुढे बोलताना म्हणाले, ऑलवेज देअर फॉर यू. मनापासून.. काय बोलायचं.. तुम्हाला बघितल्यानंतर पारणं फिटतं ना, तसं झालंय. शप्पथ सांगतो, मनापासून एवढा जीव लावला ना तुम्ही त्याची कशी परतफेड करु मला माहिती नाही. मी कामाच्या स्वरुपानं ते करतो आहे. मनापासून आय लव्ह यू टू मच.. इन्फिनिटिव्ह, असं बोलून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.

उदयनराजे हे साताराच (Satara) नव्हे, तर राज्यभरातील जनतेचा औत्सुक्याचा विषय असतो. राजकीय परिणामांची भीती न बाळगता त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे यापूर्वी राज्यात धुरळा उडवून दिला होता. मजबूत शरीरयष्टी, भेदक नजर, तडकाफडकी जागेवर निकाल लावण्याच्या त्यांच्या वृत्तीचा साताऱ्यात नेहमीच बोलबाला असतो. आमदार शिवेंद्रराजे आणि खासदार उदयनराजे या दोन्ही भावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय मतभेद निर्माण झाले आहेत. त्यातूनच ते एकमेकांवर भर मंचावर किंवा सार्वजनिकरित्या टीका करत असल्याचं समोर आलंय. शिवेंद्रराजेंनी (Shivendrasinharaje Bhosle) काही दिवसांपूर्वी उदयनराजेंवर टीका केली होती. त्यानंतर उदयनराजेंनीही शिवेंद्रराजेंचा चांगलाच समाचार घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT