सातारा

Video : जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातून बाहेर पडताच उदयनराजे म्हणाले, 'ते' सहमत आहेत

उमेश बांबरे

सातारा : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आम्ही खासगी वैद्यकिय व्यावसायिकांच्या मदतीने काही उपाययोजना सुचविल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखणे हे केवळ शासनाची जबाबदारी नाही. तर प्रत्येकाने आपापली जबाबदारी दाखवून त्यापध्दतीने त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. त्यानंतर कोरोना नियंत्रणात येईल असे त्यांनी नमूद केले. दिल्लीत होम क्वारंटाईनची पध्दत राबविली जात आहे. तेथे सौम्य व लक्षणे विरहित रूग्णांना घरीच थांबून उपचार करण्यास परवानगी दिली जाते. सातारा जिल्ह्यातही हे लागू करावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भाेसले यांनी केली.
'या' दाेन गावांतील महिला यंदा एकमेकांना शिव्या देणार नाहीत 

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर काही खासगी वैद्यकिय व्यावसायिकांसोबत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (शनिवार) जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेतली. तासाभरानंतर उदयनराजे जिल्हाधिकारी यांच्या कक्षातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्‍वभूमीवर साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला 'हा' निर्णय 

ते म्हणाले लॉकडाउन हा विषय मला पटत नाही. दिल्लीत सर्व काही सुरू आहे. त्यामुळे साताऱ्यातही सर्व काही लवकरात लवकर सुरू करा, अशी अपेक्षा मी जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली आहे. किती दिवस लोकांना घरात थांबवून ठेवणार, आणि दोन वाजेपर्यंत कोरोना नाही, त्यानंतर बाहेर येतो का असा प्रश्न मला पडला आहे. कोरोना संसर्ग रोखण्याची जबाबदारी केवळ शासनाची नाही तर आपाल्या प्रत्येकाची आहे. प्रत्येकाने स्वत: वर बंधने घालून घेतली पाहिजेत.
ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

काहींचे हातावर पोट असून काहींनी कर्ज काढलेले आहे. तरी त्यांना बॅंकांनी मुभा दिली असली तरी लॉकडाउन उठल्यावर या व्यावसायिकांना मागील व्याज भरावे लागणार आहे. त्यामुळे लोक गप्प बसणार नाहीत. लोकांचा संयम सुटला तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सातारा जिल्ह्यातही सर्व काही सुरू करा, अशी सूचना केली आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लॉकडाउन उठविले जाईल, असे आश्वासन दिल्याचे उदयनराजेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो मार्गिका ३ च्या तिकीट दरांची घोषणा; ३ नोव्हेंबरला मोदींच्या हस्ते उद्घाटन

'इच्छाधारी नागीण'ची मुख्य अभिनेत्री बदलली! नक्की कारण काय? झी मराठीने दिला प्रेक्षकांना धक्का; नवा प्रोमो Viral

Latest Marathi News Update : पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी साजरी होणार? बच्चू कडूंचा सरकारला सवाल

Recharge Plan: स्वस्त रिचार्ज प्लान फक्त १७९ रुपयांपासून सुरू! वर्षभर कॉलिंगची सुविधा...पाहा आणखी काय मिळणार?

Latur District Bank: ‘जिल्हा बँक सहकारी राहिली नाही, देशमुख कुटुंबीयांची कॉर्पोरेट बँक झाली’; आमदार संभाजीराव पाटील निलंगेकरांचा घणाघात

SCROLL FOR NEXT