सातारा

भारीच! कऱ्हाडात खडकातही फुलणार वृक्षांची लागवड, पक्ष्यांना ठरणार 'आधारवड'

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : नदीकाठावरील पक्ष्यांची आश्रयस्थान वाढवणाऱ्या वृक्षांच्या लागवडीसह नदीकाठावरील खडकातही पिंपळ लावून तेथील नैसर्गिक सौंदर्य समृद्ध करण्याचा उपक्रम येथे एनव्हायरो फ्रेंडस्‌ क्‍लब व पालिकेतर्फे हाती घेण्यात येणार आहे. कोरोनामुळे थंडावलेला वृक्ष संगोपन व संवर्धनाचाही उपक्रम हाती घेतला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक वॉर्डात किमान 100 वृक्षांची लागवड केली जाणार आहे. शहरातील नैसर्गिक तलावांचे स्त्रोतही सक्षम करण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत.
 
स्वच्छ व हिरवेगार कऱ्हाड अंतर्गत हे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. शहरातील विविध मोकळ्या जागी पालिका वृक्ष लावणार आहेत. आतापर्यंत ईदगाह मैदान परिसरात किमान 100 झाडे लावण्यात आलेली आहेत. कोरोनामुळे त्यात खंड पडला होता. पुन्हा ती मोहीम अधिक गतीत येणार आहे. त्यात नदीकाठावरील पक्ष्यांची आश्रयस्थाने असलेली वृक्ष लावण्यात येणार आहे. त्यात पिंपळ, पिंपर्णी, लिंब काटेसावर आदी वृक्षांचा समावेश आहे. त्यामुळे अधिक नैसर्गिक वातावरण निर्मिती कायम राहणार आहे. त्यासाठी नदीकाठवरील पाहणी सुरू आहे. त्यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीची बैठकही घेऊन आराखडा केला जाणार आहे. 

कऱ्हाडने स्वच्छ सर्वेक्षणात देशात पहिला क्रमांक मिळवला. त्यानंतर पालिकेने स्वच्छतेत सातत्य ठेवले आहे. कोरोनासारख्या महामारीतही पालिका सतर्क होती. शहरातील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी पालिकेने त्याचा सर्व्हेही केला. त्यानुसार एका प्रभागात किमान 100 वृक्ष लावले जाणार आहेत. त्यानुसार किमान तीन हजार वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट आहे. किमान तीन वर्षांचे वृक्ष लावले जातील. त्याच्या वाढीचा वेग जास्त असतो. त्याची वाढही होताना देखभालीची जबाबदारी स्थानिकांवर आहे. त्यानुसार जागा निवडल्या गेल्या आहेत. त्यात इदगाह मैदानात 100 झाडे लावली आहेत. शहरातील अन्य मोकळा जागी आता हिरवीगार होणार आहे.

अशी होणार ग्रीनरी 

  • नदीकाठावरील पक्ष्यांसाठी लावले जाणार मोठे वृक्ष 
  • नदीकाठावरील खडकात बहरणार पिंपळ 
  • शहरातील नैसर्गिक तलावांचे होणार पुनरुज्जीवन 
  • प्रत्येक वॉर्डातील मोकळ्या जागेत होणार वृक्षारोपण 
  • स्थानिक नगरसेवकांसह नागरिकांचाही पुढाकार 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT