Bhuinj Crime News esakal
सातारा

Satara Crime : ग्रामपंचायतीच्या आवारात दगडाने ठेचून हमालाचा निर्घृण खून; तोंडातून, डोक्यातून रक्तस्त्राव

ग्रामपंचायतीच्या आवारात रात्री साडेदहानंतर अनिल कुचेकर याचा खून झाला.

विलास साळुंखे

मारहाणीनंतर मृतदेह सुमारे शंभर फूट अंतरावर फरफटत नेऊन टाकला आहे.

भुईंज : येथील पाणी पुरवठा आवारात अज्ञात दोन ते तीन जणांनी अनिल नामदेव कुचेकर यांचा ऊस, झाडाच्या फांद्यांनी व दगडाने मारहाण निर्घृण खून केला. भुईंज (Bhuinj Police Station) येथील कृष्णा नदीकाठी असलेल्या ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा स्कीमच्या आवारात रात्री साडेदहानंतर अनिल कुचेकर (वय ३५) याचा खून झाला.

अनिल रात्री साडेदहा वाजेपर्यंत त्याच्याबरोबर हमालीत असणारे दोघा संशयितांना बरोबर दारुच्या दुकानासमोर शेवटी दिसला होता. त्यानंतर आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास माधव सुरेश चव्हाण हा पाण्याच्या टाकीच्या शेजारुन जात असताना त्याला अनिल पडलेल्या अवस्थेत दिसला.

त्याच्याजवळ जाऊन माधवने पाहिले असता अनिलच्या डोक्याच्या पाठीमागून रक्तस्त्राव झालेला दिसला, त्याने अनिलचा चुलतभाऊ युवराज कुचेकर यास सांगितले. युवराज कुचेकर याने घटनास्थळी येऊन पाहिले असता अनिल मृतावस्थेत पडलेला दिसला. त्याने या घटनेची माहिती ताबडतोब भुईंज पोलिस ठाण्यात जाऊन दिली.

घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक विशाल भंडारे, नितीन जाधव, चंद्रकांत भोसले, संजय धुमाळ आदी आले असता अनिलचा मृतदेह पंपहाऊसच्या मैदानाशेजारी आढळून आला. मृतदेहापासून शंभर फूट अंतरावर त्याला मारहाण करण्यात आल्याच्या खूना असून ऊस, झाडाच्या फांद्या, एक मध्यम आकाराचा दगड, तसेच लहान दोन-तीन दगड तसेच नळाच्या पाइपचे तुकडे आढळून आले आहेत. मारहाणीनंतर मृतदेह सुमारे शंभर फूट अंतरावर फरफटत नेऊन टाकला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT