Lonand Crime News esakal
सातारा

घरासमोर झोपलेल्या तरूणाचा गळा चिरून निर्घृण खून I Lonand

सकाळ डिजिटल टीम

राहुल अंथरुणावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला.

लोणंद पोलीस स्टेशन (Lonand Police Station) हद्दीतील पाडेगाव (ता. फलटण) येथील शिवंचा मळा इथं घराबाहेर झोपलेल्या तरूणाचा अज्ञातांनी निर्घृण खून केल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी उघडकीस आली. लोणंद पोलीस घटनास्थळी पोहचले असून चौकशी सुरू केलीय. या घटनेनंतर मोठी खळबळ उडालीय.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाडेगाव गावठाण पासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवंचा मळा येथील राहुल नारायण मोहिते (वय 31) हा तरूण आपल्या घरासमोर झोपलेला होता. झेपेमध्येच त्याच्यावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार केला. तसेच गळा कापून त्‍याचा निर्घृण खून केला. यामध्ये राहुल याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने मोठा घाव घातल्याने जखम खोलवर गेल्याने मोठ्या प्रमाणावर रक्‍त स्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, घरातील लोक सकाळी बाहेर आले असता त्यांना राहुल अंथरुणावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर लोकांनी या घटनेची तत्काळ माहिती लोणंद पोलिसांना दिली. खुनाची माहिती मिळताच घटनास्थळी लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांना रक्‍ताच्या थारोळ्यात राहुलचा मृतदेह पडल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून राहुल याचा खून नेमका कोणत्या कारणासाठी केला असावा याचा तपास लोणंद पोलीस करत आहेत. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी भेट दिली असून पुढील तपासासाठी तपासी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

Viral Video : वजन झेपलं नाही अन् बंजी जंपिंगची दोरी तुटली..खोल दरीत पडून शरीराचे अवयव झाले वेगळे; धक्कादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल

31st December Party : अभी तो पार्टी शुरू हुई है..! बार, पब अन् क्लब मध्ये ‘New Year Celebration’ पहाटे पाच पर्यंत चालणार

Politics: मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात उलथापालथ; विधानसभा उपाध्यक्षांनी दिला राजीनामा, कारण...

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT