Narendra Patil esakal
सातारा

'दादा धडाडीचे नेते, उपमुख्यमंत्री झाल्यावर का बदलले'

आमदार शिंदे मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत का, असे विचारले असता, ते त्यांनाच माहित. पण ते मराठा आहेत का, ते तपासले पाहिजे, असा सवाल करत आम्ही प्रत्येकाच्या सोबत आहोत. विरोध आणि संघर्षाची भीती मला कधी वाटली नाही आणि ते खासदारकीच्या निवडणूकीत तुम्ही पाहिलेय. त्यामुळे यापुढे कोणी समाजातील युवकांना धमकावण्याचा प्रयत्न करु नये, असा इशाराही पाटील यांनी नाव न घेता आ. शिंदे यांना देत कालच्या घटनेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्ट केले.

गिरीश चव्हाण

सातारा : अजितदादा धडाडीचे नेते आहेत. मला त्यांच्याविषयी आदर असून ते उपमुख्यमंत्री झाल्यावर का बदलले हे मला समजत नाही. विरोधात होते त्यावेळी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विषयावर ते प्रत्येकवेळी माझ्याशी बोलायचे. आता ते काही बोलत नाहीत. त्यांनी सारथी संस्था बंद पाडली, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळास दोन वर्षात एक रुपयाही दिला नसल्याचा आरोप करत माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) टिका करत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्वत:च्या कर्माने पडेल, असे वक्‍तव्य केले. (narendra patil ajit pawar maratha reservation satara marathi news)

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या युवकांना आमदार शशिकांत शिंदे यांनी धमकावले आहे. यामुळे त्या युवकांच्या जीवाला धोका असून त्यांना पोलिस संरक्षण देण्याची गरज आहे. पोलिसांनी संरक्षण देतानाच त्या युवकांच्या कुटुंबियांची तक्रार नोंदवून घ्यावी, त्यांनी तक्रार न दिल्यास पोलिसांनी पुढाकार घेत स्वत: आमदार शिंदे यांच्याविरोधात तक्रार नोंदविण्याची मागणी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी सातारा येथे केली.

पाटील म्हणाले, केंद्र शासनाच्या 102 व्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. ज्यावेळी हि घटनादुरुस्ती झाली त्यावेळी आत्ताचे सत्ताधारी मुग गिळून का गप्प बसले होते. त्याच घटनादुरुस्तीच्या आधारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देवू केले होते. त्यावेळी आत्ता सतेत असणारी राष्ट्रवादी, राष्ट्रीय कॉंग्रेस विरोधात होती, त्यावेळी त्यांना का विरोध केला नाही. विरोधात असताना एक बोलायचे आणि सत्तेत आल्यावर दुसरे बोलायचे, हे त्यांचे धोरण आहे. मराठा आरक्षण हा आपल्या राज्यापुरता विषय आहे. त्यासाठी आम्ही पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना हात जोडून विनंती करणार, त्यांची भेट घेणार असे, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणत आहेत. केव्हा भेटायला जाणार, तुम्ही मातोश्री सोडून बाहेर पडत नाही. जाता ते वर्षा बंगल्यावर त्याठिकाणी इतरांशी बैठका घेता, कधी मंत्रालयात गेलाय का, मंत्रीमंडळाची बैठक बोलावलीय का, अशा शब्दात पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टिका केली.

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मराठ्यांबरोबरच इतर राज्यातील जातींच्या आरक्षणाचे सुध्दा प्रश्‍न आहेत, ते प्रश्‍न काही दहा मिनिटात निकाली निघणार आहेत का, आणि हे चालले दिल्लीला अशी टिकाही पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. दगडफेक करणाऱ्यांची माहिती मिळाल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे हे पोलिसांअगोदर त्या युवकांच्या घरी गेले. त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत. त्यात ते धमकावत असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी त्या युवकांना संरक्षण देत त्यांची तक्रार नोंदवून घ्यावी. आम्ही त्यांच्यासोबत असून त्यांच्या केसाला धक्का लागला तर मराठा उद्रेक काय असतो, ते धमकावणाऱ्यांना दाखवून देवू. त्यांच्या कुटुंबियांनी भीती, दबावापोटी तक्रार न दिल्यास पोलिसांनी स्वत: पुढे येवून तक्रार नोंदविण्याची मागणीही पाटील यांनी यावेळी केली.

आमदार शिंदे मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत का, असे विचारले असता, ते त्यांनाच माहित. पण ते मराठा आहेत का, ते तपासले पाहिजे, असा सवाल करत आम्ही प्रत्येकाच्या सोबत आहोत. विरोध आणि संघर्षाची भीती मला कधी वाटली नाही आणि ते खासदारकीच्या निवडणूकीत तुम्ही पाहिलेय. त्यामुळे यापुढे कोणी समाजातील युवकांना धमकावण्याचा प्रयत्न करु नये, असा इशाराही पाटील यांनी नाव न घेता आ. शिंदे यांना देत कालच्या घटनेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT