NCP agitation against Bandatatya Karadkar esakal
सातारा

ज्या मठात बंडातात्या लहानाचे मोठे झाले, तिथंच त्यांच्या प्रतिमेला..

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

'बंडातात्यांनी सांप्रदायावर बोलायला हवं होतं, मात्र ते राजकीय नेत्यांवर बोलले. ते चुकीचं आहे.'

कऱ्हाड (सातारा) : येथील मारूतीबुवा कऱ्हाडकर (Marutibuwa Karhadkar) मठासमोरच वाईन विक्रीवरून वारकरी नेते बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी काल साताऱ्यात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेस जोडे मारण्याचे आंदोलन झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) व वारकऱ्यांतर्फे झालेल्या निषेधात कऱ्हाडकरांच्या मठासमोरच बंडातात्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकुमार बटाणे, रणजीत पाटील यांच्यासह वारकरी उपस्थित होते. बंडातात्यांच्या वक्तव्याचा राज्यभरात निषेध नोंदवला जात आहे. कराडात मारूतीबुवा कऱ्हाडकर मठाच्या पायरीवर आंदोलन झाले. यावेळी बंडातात्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. उपस्थितांनी बंडातात्यांची प्रतिमा आणली होती. त्यालाही जोडे मारले. यावेळी बंडातात्यांचा निषेध असो, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी बंडातात्या यांचे खरे नाव घेवूनही त्यांच्या निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बटाणे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. बटाणे म्हणाले, कऱ्हाडला वारकरी सांप्ररदायाची मोठी परंपरा आहे. मात्र, बंडातात्या यांच्या वक्तव्याने त्याला डाग लागला आहे. शासनाच्या निर्णयावर वक्तव्यावर सुप्रिया सुळे, पंकजाताई मुंढे व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांचे सुपुत्र यांच्याबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह आहे. बंडातात्या वारकरी आहेत, त्यांच्या तोंडात ते शब्द शोभत नाही. कऱ्हाडकर मठाला दिडशे वर्षाची परंपरा आहे. याच मठात बंडातात्या लहानाचे मोठे झाले. येथील भगवानमामा यांच्या हाताखाली ते शिकले. मात्र, आता ते सारे विसरले आहेत. वास्तविक त्यांनी सांप्रदायावर बोलायला हवे होते, मात्र ते राजकीय नेत्यांवर बोलले. ते चुकीचे आहे. स्वतःला राजकीय झोतात व प्रसिद्धीस आणण्यासाठी त्यांनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यांचा राष्ट्रवादीतर्फे आम्ही जाहीर निषेध करत आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT