Gayatridevi Pantpratinidhi esakal
सातारा

औंध सोसायटीवर गायत्रीदेवींचं वर्चस्व; राष्ट्रवादीकडून विरोधकांचा धुव्वा

सकाळ डिजिटल टीम

सोसायटीवर राष्ट्रवादीच्या नेत्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या गटानं विरोधकांचा धुव्वा उडवून झेंडा फडकावला.

औंध : औंध विकास सेवा सोसायटीवर Aundh Vikas Seva Society (नंबर एक) राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी (Gayatridevi Pantpratinidhi) यांच्या गटाने विरोधकांचा धुव्वा उडवून झेंडा फडकावला. श्री यमाईदेवी विकास पॅनेलच्या (Yamaidevi Vikas Panel) विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.

विकास सेवा सोसायटीसाठी गायत्रीदेवींच्या नेतृत्वाखालील श्री यमाई विकास पॅनेल आणि औंध संघर्ष समितीचे जगदंबा परिवर्तन पॅनेलमध्ये सरळ लढत झाली. दोन्ही गटांनी सोसायटीची निवडणूक (Aundh Society Election 2021) प्रतिष्ठेची केली होती. अटीतटीने झालेल्या लढतीत श्री यमाई विकास पॅनेलने सर्व १३ जागांवर दणदणीत विजय मिळवून विरोधकांचा धुव्वा उडवला. २५ वर्षांनंतर निवडणूक होत असल्याने सर्वांची निकालबाबत उत्सुकता शिगेला पोचली होती. एकूण ३३२ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. ६ मते बाद झाली. स्वप्निल माळी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे यांनी बंदोबस्त ठेवला होता. विजयी उमेदवारांचे गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, चारुशिलाराजे पंतप्रतिनिधी, हर्षिताराजे पंतप्रतिनिधी, हणमंतराव शिंदे, सरपंच सोनाली मिठारी, उपसरपंच दीपक नलवडे यांनी अभिनंदन केले.

विजयी उमेदवार : भरत हणमंत यादव, मधुरा शंकरराव टोणे, महादेव बजरंग माकार, सुनील आबा इंगळे, अनुराधा एकनाथ पवार, उध्दव नाथा माने, सदाशिव बापू पवार, रमेश गोविंद जगदाळे, हणमंत दौलत देशमुख, आनंदा लक्ष्मण घोडके, गणेश प्रभाकर इंगळे, जोतिराव मानसिंग कुंभार, नाना आनंदराव कदम.

औंधच्या विकासाची बांधिलकी मी स्वीकारली आहे. कोणी कितीही दिशाभूल केली तरी औंधच्या जनतेला सर्व समजत आहे. त्यामुळे सभासदांनी विकासाला साथ देऊन सोसायटी निवडणुकीत दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. इथे आत-बाहेर काहीच नाही. पब्लिक सबकुछ जानती है।

-गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, नेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

IND vs NZ, 1st ODI: विराट कोहलीचं शतक हुकलं, पण भारतानं मैदान जिंकलं! रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

Bigg Boss Marathi 6 Live Update: लोकप्रिय इन्फ्लुएन्सर अनुश्री मानेची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

SCROLL FOR NEXT