स्वच्छ सर्वेक्षणातील घसरणीवर चर्चेची गरज sakal
सातारा

कऱ्हाड : स्वच्छ सर्वेक्षणातील घसरणीवर चर्चेची गरज

गटनेते सौरभ पाटील; कऱ्हाड पालिकेच्या मासिक सभेत केली मागणी

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : स्वच्छ सर्वेक्षणात सलग दोन वर्षे देशात पहिला क्रमांक मिळवणाऱ्या कऱ्हाड नगरपालिकेची चौथ्या क्रमांकावर झालेल्‍या घसरणीत आपण कुठे कमी पडलो, अन्य पालिकांनी काय काम केले, याचा ऊहापोह होणे गरजेचे आहे. पालिकेच्‍या स्पर्धेत झालेल्या घसरणीच्या कारणांचा ऊहापोह व चर्चा करण्यासाठी विशेष सभा घ्यावी, अशी मागणी लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी केली.

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ या वर्षाच्या स्पर्धेचे मानांकन काल (ता. ११) जाहीर झाले. त्यात कऱ्हाड पालिका चौथ्या क्रमांकावर आहे, असे स्पष्ट झाले. त्याचे पडसाद आज उमटले. पालिकेच्या सभेत लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील म्हणाले, ‘‘प्रथम क्रमांक चुकला असला तरी पहिल्या तीनमध्ये स्थान मिळालेले नाही.

आपण कुठे कमी पडलो, इतर पालिकांनी काय काम केले, याचा ऊहापोह होणे आवश्यक आहे. त्यासाठी पालिकेची विशेष सभा बोलावून चर्चा करणे आवश्यक आहे.’’ आरोग्य सभापती विजय वाटेगावकर म्हणाले, ‘‘ज्या पालिकांकडे एसटीपीसारखे प्रकल्प नाहीत, त्या पालिकांनी यश मिळवले आहे. पडद्यामागे काही झाले आहे, हे पाहण्याची आवश्यकता आहे. २० नोव्हेंबरला स्पर्धेतील गुणांकनाची माहिती मिळेल. त्यानंतर सभा घ्यावी. स्वच्छ सर्वेक्षणात चौथ्या क्रमांकावर झालेल्या घसरणीचा ऊहापोह महत्त्‍वाचा आहे. आपण कुठे कमी पडलो, याचाही विचार होणे गरजेचे आहे.’’

स्पर्धेसाठी परिश्रम घेणाऱ्यांचे कौतुक

‘जनशक्ती’चे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी कर्मचाऱ्यांचे अभिनंदनाचा ठराव सभेत मांडला. ते म्हणाले, ‘‘स्वच्छ सर्वेक्षणमधील कऱ्हाडची हॅट्‌ट्रिक हुकली असली तरी पालिका पहिल्या पाचमध्ये आहे. त्यासाठी परिश्रम घेणारे पालिकेचे कर्मचारी, अधिकारी, नागरिक, संस्था, मुख्याधिकारी, स्वच्छतादूतांचे अभिनंदन करणे महत्त्‍वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Pune News : तीन वर्षात टाकली केवळ ९ किलोमीटरचीच सांडपाणी वाहिनी; प्रशासनाने टोचले ठेकेदाराचे कान

Monsoon Session: तुकडेबंदी कायदा रद्द! पुढे कशी असेल कार्यप्रणाली? 'त्या' जमिनींना नियमातून वगळले

SCROLL FOR NEXT