Satara 
सातारा

आंतरराष्ट्रीय फोटोग्राफीत साताऱ्यातील फिल्मला नॉमिनेशन

दिलीपकुमार चिंचकर

सातारा (जि. सातारा) : बंगळूर येथे नेचर इन फोकस या संस्थेच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या वाइल्डलाइफ आंतराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेत येथील धीरज झंवर आणि प्रणित बोरा यांनी सादर केलेल्या "फॅन थ्रोटेड लिझार्ड' या फिल्मला नॉमिनेशन मिळाले आणि अंतिम स्पर्धेत पहिले स्पेशल मेन्शन बक्षीस मिळाले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. 

दरवर्षी बंगळूर येथे तीन दिवसांकरिता ही स्पर्धा आयोजित केली जाते. परंतु, यावर्षी ही स्पर्धा ऑनलाइन घेण्यात आली. स्पर्धेत संपूर्ण आशिया खंडातील स्पर्धक भाग घेतात. स्पर्धेत 2019 पासून या संस्थेने फिल्म फेस्टिव्हल हा विषयपण सुरू केला. यावर्षी तर आशिया खंडाबरोबर अमेरिका, युरोप, ओसनिया या खंडामधील राष्ट्रातून स्पर्धकांनी भाग घेतला होता. 

स्पर्धेत श्री. झंवर आणि बोरा यांनी Emerging talents ध्ये Natural history या विभागात सहभाग घेतला होता. आपल्या साताऱ्याची शान असलेल्या चाळकेवाडी पठारावरील आढळणाऱ्या फॅन थ्रोटेड लिझार्ड (सरडा) च्या जीवनशैलीचा अभ्यास करून त्याच्या जीवनातील प्रत्येक वळणावरील चित्रण करून त्याच्या जीवनावर एक छोटा जीवनपट तयार करून स्पर्धेमध्ये सादर केला. या स्पर्धेमध्ये 120 स्पर्धकांमधून झंवर आणि बोरा यांनी सादर केलेल्या "फॅन थ्रोटेड लिझार्ड'च्या फिल्मला नॉमिनेशन मिळाले. 

संपादन : पांडुरंग बर्गे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT