Shivendraraje Bhosale esakal
सातारा

Shivendraraje Bhosale : छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; शिवेंद्रराजेंनी व्यक्त केला वेगळाच संशय

'महापुरुष, देशाची बदनामी करून समाजात तेढ निर्माण कोणी करत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही'

सकाळ डिजिटल टीम

मी कुणालाही पाठीशी घालत नाही. फिरोज पठाण यांची चौकशीही पोलिसांनी करावी; पण त्‍यानंतर या घटनेत पुढे आलेल्‍यांच्‍याही चौकशा होणे आवश्‍‍यक आहे.

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज, देश आणि महाराष्ट्राचा अपमान कधीही खपवून घेणार नाही. दोन दिवसांपूर्वी समाजमाध्‍यमावर प्रसारित झालेली आक्षेपार्ह पोस्ट निंदणीय असून, त्याचा आम्ही निषेध करतो. या प्रकरणाचा सखोल तपास करून यामागील मास्टरमाईंडचा शोध घेत त्‍याच्‍यावर कारवाई करण्‍याची मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी त्‍यांनी याप्रकरणी पसरणाऱ्या अफवांकडे दुर्लक्ष करत सातारकरांनी शांतता राखण्‍याचे आवाहन केले, तर तपासात सायबर सेल अपयशी ठरत असल्‍याबाबत त्यांनी नाराजी व्‍यक्‍त केली. एका अल्‍पवयीन मुलाच्‍या मोबाईलवरून समाजमाध्‍यमांवर प्रसारित झालेल्‍या आक्षेपार्ह पोस्टवरून साताऱ्यात तणाव निर्माण झाला होता.

यातूनच शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांचे समर्थक फिरोज पठाण यांच्‍या कार्यालयाची अज्ञात युवकांनी तोडफोड केली होती. याचबाबतीत भूमिका मांडण्‍यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. ते म्‍हणाले, ‘‘महापुरुष, देशाची बदनामी करून समाजात तेढ निर्माण कोणी करत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी घडलेल्‍या घटनेचा सखोल तपास करत सत्य सर्वांसमोर आणावे.

यामध्ये जो कोणी दोषी असेल, मग तो कोणाच्‍याही जवळचा का असेना, त्‍याला शिक्षा करणे आवश्‍‍यक आहे. चुकीच्‍या माहितीच्या आधारे युवकांना भडकावण्यात येत आहे. एखाद्याच्‍या राजकीय विचारांना विरोध असेल, तर त्‍यांनी तसे स्‍पष्‍ट बोलावे. मात्र, त्‍यासाठी समाजात तेढ निर्माण करणे चुकीचे आहे.’’

तक्रारीनंतर पोलिसांनी त्‍या अल्‍पवयीन युवकास ताब्‍यात घेत त्‍याच्‍याकडील मोबाईल जप्‍त केला. मोबाईल पोलिसांच्या ताब्‍यात घेतल्यानंतर अकाउंट ब्‍लॉक करणे आवश्‍‍यक होते, मात्र तसे झाले नाही. परिणामी, आणखी मजकूर येणे सुरूच राहिले. हे रोखण्‍यासाठी सायबर सेलने गतिमान कामकाज करणे आवश्‍‍यक होते, मात्र तसे झाले नाही. तंत्रज्ञानामुळे काहीही लपून राहू शकत नाही. मोबाईल जर हॅक केला असेल, तर ते शोधणे सायबर सेलला सहजशक्‍य आहे.

मी कुणालाही पाठीशी घालत नाही. फिरोज पठाण यांची चौकशीही पोलिसांनी करावी; पण त्‍यानंतर या घटनेत पुढे आलेल्‍यांच्‍याही चौकशा होणे आवश्‍‍यक आहे. गृहमंत्री म्‍हणून देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती घेत पोलिसांना सूचना केल्‍या असतील, तर पोलिसांनी योग्‍य तपास करत त्‍यात प्रत्‍यक्ष, अप्रत्‍यक्ष गुंतलेल्‍यांना तसेच मास्‍टरमाईंडला शोधणे आवश्‍‍यक असून, तपासाबाबत मी पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्‍याशी चर्चा करणार असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगितले.

मोबाईल हॅकचा संशय

या प्रकरणातील अल्‍पवयीन मुलगा सध्‍या निरीक्षणगृहात असून, मोबाईल पोलिसांच्‍या ताब्‍यात आहे. पोलिसांच्‍या ताब्‍यातील मोबाईलवरून नंतर आणखी काही मजकूर प्रसारित झाला आहे. आज सकाळी त्‍याच मुलाच्‍या वडिलांच्‍या मोबाईलवरून सुद्धा असाच प्रकार घडवून आणण्‍याचा प्रयत्‍न झाला. यामुळे मोबाईल हॅक झाल्‍याचा संशय असून, त्‍याचा शोध सायबरने घेणे आवश्‍‍यक असल्‍याचे मतही शिवेंद्रसिंहराजेंनी यावेळी मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

Chhagan Bhujbal : लिंगायत समाजातील पोटजातींचा लवकरच ओबीसींमध्ये समावेश; मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन!

"म्हणून मी वडिलांचं टॅक्सी चालवणं बंद केलं.." ती आठवण सांगताना ढसाढसा रडले भरत जाधव; जुना VIDEO चर्चेत

Rohit Sharma नवी लँबॉर्गिनी घेऊन निघाला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला; फॅनने पाहताच पाहा कशी दिली रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT