सातारा

आण्णासाहेब महामंडळ कर्ज प्रकरण त्रुटी

हेमंत पवार

मराठा समाजातर्फे त्रुटी दूर करण्याचे आमदार अरुण लाड यांना साकडे

कऱ्हाड (सातारा): सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज प्रकरणात येणा-या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी विधान परिषदेचे आमदार अरुण लाड यांच्याकडे निवेदनाव्दारे ओमकार देशमुख यांनी केली आहे.

निवेदनातील माहिती अशी: महाराष्ट्रातील असंख्य तरुण-तरुणी सुशिक्षित बेरोजगार आहेत. आरक्षणापासून वंचित मराठा समाज आहे. हा युवा मराठा समाज नोकरी मिळत नाही म्हणून व्यवसायाकडे वळला आहे. परंतु व्यवसाय करण्यासाठी आर्थिक सक्षम नसल्याने व्यवसायासाठी कर्जाची आवश्यकता आहे.

युवा वर्गाला आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा मार्फत कर्ज मिळावे अशी अपेक्षा असते. मात्र राष्ट्रीयकृत बँकाकडून तरुणांना सहजसहजी कर्ज उपलब्ध होत नाही. बॅंका अनेक अटीशर्ती लावत आहेत. त्यामुळे कर्ज आणि व्यवयासायापासून मराठा समाजातील तरुण वंचित राहत आहेत. हे थांबले पाहीजे यासाठी तुम्ही स्वतः लक्ष घालून महामंडळ, बॅंका, मंत्री, वरिष्ठ अधिकारी व युवक यांना एकत्र घेऊन बैठक घेवून तोडगा काढावा, अशी मागणी निवेदनाव्दारे देशमुख यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: श्री चरणीची भेदक गोलंदाजी; झिम्बाब्वेचा डाव आटोपला, भारतासमोर किती धावांचं लक्ष्य?

Baramati News : निवडणूक पदवीधरची....बारामतीचे राजकारण ढवळून निघाले...

Marathi News Live Updates: FDA चा औषध विक्रेत्यांना दणका; राज्यात २९ परवाने रद्द, ७१ निलंबित

Shri Someshwar Sugar Factory : सोमेश्वरच्या सभासद-कामगारांची दिवाळी झाली गोड! 90 कोटींच्या रकमा खात्यावर वर्ग; सभासदांना उर्वरित बिल तर कामगारांना बोनस जमा

Pune News : दिवाळीत फटाके उडविताना घ्या खबरदारी; अग्निशामक दलाकडून सुरक्षिततेची नियमावली

SCROLL FOR NEXT