Crime esakal
सातारा

आठ वर्षाच्या मुलाला विष पाजून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पित्याला जन्मठेप

संतोष याचा वैशाली यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना दोन मुले होती.

प्रवीण जाधव

सातारा : कौटुंबिक कलहातून आठ वर्षांच्या मुलाला विष पाजून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पित्याला प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर. डी. सावंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. शिवराज संतोष भिंगारे (वय 8 वर्षे) असे खून झालेल्या मुलाचे, तर संतोष लक्ष्मण भिंगारे (वय 35, सध्या रा. पाचवड ता. वाई मूळ रा. कडेगाव, जि. सांगली) असे शिक्षा मिळालेल्या पित्याचे नाव आहे. (One People From Pachwad Sentenced To Life Imprisonment Satara Crime News)

संतोष याचा वैशाली यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना दोन मुले होती. पती-पत्नीमध्ये वारंवार वाद व्हायचे. त्यामुळे वैशाली मुलांसह माहेरी कडेगाव येथे राहात होती, तर संतोष पाचवड येथे राहात होता. मृत शिवराज हा कडेगाव येथील शाळेत जात होता. 4 मार्च 2017 ला संतोषने शिवराजच्या शाळेत जाऊन त्याचा ताबा घेतला. त्यानंतर त्याला भुईंजमध्ये आणले. तोपर्यंत शिक्षकांनी वैशाली भिंगारे यांना याबाबत माहिती दिली. तिने ही माहिती कडेगाव पोलिसांना दिली.

दरम्यान, भुईंजमध्ये आल्यावर त्याने शिवराजला विष पाजले. त्यानंतर स्वत: विष पिऊन याबाबत फोनवरून पत्नीला माहिती दिली. दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 10 मार्च 2017 ला शिवराजचा मृत्यू झाला. याबाबत वैशाली यांनी भुईंज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. भुईंज पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपत्र सादर केले. साक्षीदारांच्या साक्षी व सहायक सरकारी वकील ऍड. नितीन मुके यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश सावंत यांनी संतोषला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

One People From Pachwad Sentenced To Life Imprisonment Satara Crime News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मोठा निकाल! गरोदरपणात सुनेला नोकरी सोडण्याचा सल्ला देणे ही क्रूरता नाही; मुंबई न्यायालयाचा निर्णय

Mumbai News : गुटखा-हुक्का प्रकरणात विभागाची वादग्रस्त भूमिका; जप्त माल सोडण्यास परवानगी, अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update: मुंबईमध्ये भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल...

Railway Police : लोहमार्ग पोलिस दलात राजश्री नाणेकर यांची निवड

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त मराठी ओटीटी’चा खास नजराणा! ७५ हून अधिक गाजलेली नाटकं घरबसल्या पाहा

SCROLL FOR NEXT