Covid Center esakal
सातारा

Good News : खासदार रणजितसिंहांनी उभारले स्वखर्चातून 100 बेडचे Covid Center

कोविड सेंटरमध्ये 50 ऑक्‍सिजन बेड व 50 विलगीकरणाचे बेड असे एकंदरीत 100 बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

किरण बोळे

फलटण शहर (सातारा) : खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (Ranjitsingh Naik-Nimbalkar) यांच्या प्रयत्नातून येथे सुरू होत असलेल्या लोकनेते हिंदूराव नाईक-निंबाळकर कोविड केअर सेंटरचा (Covid Center) प्रारंभ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते उद्या (ता. 12) सायंकाळी पाच वाजता ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. (Online Inauguration Of Covid Center At Phaltan by Chandrakant Patil Satara News)

फलटण शहरातील उत्कर्ष लॉजमध्ये हे सेंटर उभारण्यात आले आहे. उद्‌घाटन समारंभास खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, फलटण नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक- निंबाळकर, प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव उपस्थिती राहणार आहेत.

या सेंटरमध्ये 50 ऑक्‍सिजन बेड व 50 विलगीकरणाचे बेड असे एकंदरीत 100 बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे सेंटर खासदार निंबाळकर यांनी स्व खर्चातून उभे केले आहे. तेथे बाधित रुग्णांना आवश्‍यक सुविधा देण्याबरोबरच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग, औषधे व ऑक्‍सिजनची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. या ठिकाणी उपचार घेणाऱ्या रुग्णांना स्वच्छ पिण्याचे पाणी, चहा, नाष्टा व जेवणाची सुविधा ही पूर्णपणे मोफत पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी दिली आहे.

Online Inauguration Of Covid Center At Phaltan by Chandrakant Patil Ranjitsingh Naik-Nimbalkar Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar On Narendra Modi : मोदींनी ७५ व्या वर्षी राजकारणातून निवृत्त व्हावं का? शरद पवारांनी एका वाक्यात सांगितलं, देवाभाऊंवरी टीका

Gadchiroli News: दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान; गडचिरोली जिल्ह्यातील मोडस्के जंगल परिसरात चकमक

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

बाबो! सुरज चव्हाणचं खरंच लग्न ठरलं? सोशल मीडियावर शेयर केलेली पोस्ट चर्चेत, चाहत्यांचा म्हणाले..."हीच का आपली वहिनी?"

SCROLL FOR NEXT