सातारा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात बंद झालेल्या अस्थिरोग व अन्य आजारांच्या शस्त्रक्रिया सुरू करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत; परंतु स्वतंत्र वॉर्ड नसल्याने मोठ्या शस्त्रक्रिया अद्याप होत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. तो टाळण्यासाठी या विभागाला स्वतंत्र वॉर्ड उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
मार्च महिन्यापासून जिल्ह्यात, तसेच देशात कोरोना संसर्गाचे सावट घोंघावू लागले. सुरवातीला अत्यंत कमी असणारी रुग्णांची संख्या जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत गेली. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनावरील उपचाराची सुविधा सुरवातीला नव्हती. त्यामुळे या रुग्णांवर उपचारासाठी मुख्य जबाबदारी जिल्हा रुग्णालयावर आली. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात तातडीने सुविधा निर्माण करण्यात आल्या. स्वतंत्र कोविड रुग्णालय उभारणीस वेळ नसल्याने जिल्हा रुग्णालयातील आहे त्या पूर्वीच्याच वॉर्डमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचाराची सुविधा करण्यात आली. त्यामुळे पूर्वीच्या मेडिसीन, शस्त्रक्रिया तसेच अस्थिरोग विभागाच्या वॉर्डमध्येच कोरोना व कोरोना संशयित रुग्णांना दाखल करण्यास सुरवात झाली. त्यामुळे मार्चपासून जिल्हा रुग्णालयातील अस्थिरोग व अन्य शस्त्रक्रिया बंद झाल्या होत्या. त्यामुळे तेव्हापासून जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे. जिल्हा रुग्णालयात अत्यल्प किमतीत होणाऱ्या शस्त्रक्रियांसाठी नागरिकांना हजारो रुपये मोजावे लागत आहेत. कोरोनामुळे आधीच नागरिकांच्या उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. त्यातच उपचारासाठीही भुर्दंड सोसावा लागत असल्याने "इकडे आड तिकडे विहिर' अशी नागरिकांची अवस्था झाली आहे.
ज्या आजीनं मांडीवर प्राण सोडला, त्याच आजीच्या तिरडीवरुन नाना पाटील पोलिसांना तुरी देत पसार झाले!
कोरोना संसर्ग वाढीचा वेग सध्या मंदावला आहे. त्याचबरोबर कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी स्वतंत्र कोविड रुग्णालयाची निर्मितीही झाली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयावरील कोरोना रुग्णांचा भार काही प्रमाणात मंदावला आहे. त्याचा जिल्ह्यातील अन्य आजारांच्या रुग्णांना लाभ होणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी नेत्र शस्त्रक्रियांचा विभाग सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचबरोबर अस्थिरोग व अन्य शस्त्रक्रियांच्या रुग्णांसाठी वॉर्डही उपलब्ध करून दिला आहे; परंतु या एकाच वॉर्डमध्ये मेडिसीनच्या रुग्णांबरोबरच शस्त्रक्रियांचे रुग्ण ठेवावे लागत आहेत. त्यामुळे रुग्णांना जागा कमी पडत आहे. त्याचबरोबर अन्य रुग्णांमुळे मोठ्या शस्त्रक्रिया असलेल्या रुग्णांना इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे.
दिवाळीतही आशा, गटप्रवर्तकांच्या पदरी निराशा; वाढीव मानधन कागदावरच
जिल्हा शल्यचिकित्सकांनी लक्ष घालावे
सिव्हिलमध्ये सध्या मोठ्या शस्त्रक्रिया होत नाहीत. परिणामी रुग्णांना खासगी रुग्णालयांवरच अवलंबून राहावे लागत आहे. रुग्णांची ही परवड थांबविण्यासाठी शस्त्रक्रियांच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.