Vishal Borate
Vishal Borate Sakal
सातारा

व्यंगावर मात करत विशालने मिळविला आयआयटी भुवनेश्वरमध्ये प्रवेश

रूपेश कदम

जिद्द व चिकाटीसोबत मनात दुर्दम्य आशावाद असेल तर कोणतीही परिस्थिती यशात अडथळा बनू शकत नाही.

दहिवडी - जिद्द व चिकाटीसोबत मनात दुर्दम्य आशावाद असेल तर कोणतीही परिस्थिती यशात अडथळा बनू शकत नाही. सातत्यपूर्ण प्रयत्न केले तर या जगात अशक्य काही नाही, हेच दाखवून दिले आहे बिदाल (ता. माण) येथील दिव्यांग विद्यार्थी विशाल बोराटे (Vishal Borate) याने. त्याने उत्तम गुण मिळवून आयआयटी भुवनेश्वरमध्ये प्रवेश (IIT Admission) मिळविला आहे.

बिदाल हे माण तालुक्यातील एक आदर्श गाव. याच गावातील विशाल हा एका शेतकऱ्याचा दिव्यांग मुलगा. पण, आपले शारीरिक व्यंग विशालने शिक्षणात कधीही अडथळा बनू दिले नाही. इयत्ता पाचवीत नवोदय विद्यालयाची परीक्षा उत्तीर्ण होऊन सातारा येथे सहावीला प्रवेश मिळवला. शैक्षणिक वाटचाल सुरळीत सुरू असताना नववीत असताना स्पर्धेच्या निमित्ताने गोवा, दिल्ली येथे गेला असता अचानक तब्येत बिघडली. अगदी मृत्यूच्या दारातून तो परत आला.

या आजारपणात शिक्षणाचे एक वर्ष वाया गेले. त्यानंतर ‘नवोदय’ सोडून विशाल गावी आला. दहावीत राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा उत्तीर्ण झाला. अकरावीला दहिवडी कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी उच्च ध्येय मनात असल्यामुळे जेईई, सीईटी परीक्षांचा घरूनच अभ्यास करण्यास सुरुवात केली. कोणताही खासगी क्लास लावला नसताना घरूनच नियोजित पध्दतीने अभ्यास केला. या अभ्यासामुळे सीईटी उत्तीर्ण झालाच. पण, जेईई मेन्स, जेईई अ‍ॅडव्हान्स पास होऊन आयआयटी भुवनेश्वर येथे काम्प्युटर सायन्सला प्रवेश मिळविण्यात यशस्वी ठरला. या घवघवीत यशाबद्दल विशालवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मी माझ्या शारीरिक तसेच आर्थिक परिस्थितीचे कधीही भांडवल केले नाही. उलट या परिस्थितीमुळेच मला झगडण्याची, लढण्याची प्रेरणा मिळाली. जेईई, सीईटीचा अभ्यास करताना मी ऑनलाइन माध्यमांचा अभ्यासासाठी सुयोग्य वापर केला. नियमित पुस्तकांसोबत इतर पुस्तकांचाही वापर करत अनेक प्रश्न सोडवले. एखादी संकल्पना समजली नाही तर बी. टेक. झालेल्या मोठ्या बहिणीकडून व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न केला. दररोज आठ ते दहा तास अभ्यास केला. या वाटचालीत आई-वडिलांनी मला पूर्ण साथ दिली. या सर्व प्रयत्नांचे एकत्रित फलित म्हणून मी आयआयटीला प्रवेश मिळवू शकलो.

- विशाल बोराटे

विशालने मिळवलेले यश हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी परिस्थितीचे अवडंबर न माजवता उत्तम मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली योग्य दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न केले तर यश निश्चित मिळतेच, हे विशालने सिध्द करून दाखवले आहे.

- भरत चौगले, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, माण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT