Oxygen 30 esakal
सातारा

गोडोलीत बाधितांसाठी मोफत औषधोपचारासह Oxygen Bed; पंचायतीचा पुढाकार

जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांना बेडअभावी उपचार मिळणे जिकिरीचे झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्यात कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांना बेडअभावी उपचार मिळणे जिकिरीचे झाले आहे. या परिस्थितीत कोरोना रुग्णांसाठी पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण व विनोद मोरे मित्र समूह गोडोली व विलासपूर ग्रामस्थांच्या सहकार्यातून गोडोली येथील धनलक्ष्मी मंगल कार्यालयात 30 बेडचे मोफत (Oxygen Bed) विलगीकरण कक्षाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. (Oxygen 30 Bed Facility At Godoli Satara News)

या कक्षाचे उद्‌घाटन बाबा फाळके, राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नगरसेवक शेखर मोरे, शशिकांत पारेख, बाळासाहेब महामुलकर, धनंजय शिंदे, पोपट मोरे, अमित यादव, दत्ता घोरपडे, विद्याधर शिंदे आदी उपस्थित होते. या विलगीकरण केंद्रात महिलांसाठी स्वतंत्र कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. याप्रसंगी आशुतोष चव्हाण म्हणाले, "जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. त्यामुळे, अनेक नागरिकांना ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटरअभावी उपचार मिळत नाही.

तसेच, जिल्ह्यातील कित्येक बाधित रुग्णांना विलगीकरणाची अडचण असल्याचे दिसून येत आहे. अनेक बाधित गृह विलगीकरणात असताना वैद्यकीय उपचार मिळत नसल्याने जिवाला धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. या परिस्थितीत संशयित व बाधित रुग्णांसाठी विलगीकरण कक्षाची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी 30 बेडची सोय करण्यात आली असून, रुग्णांना मोफत औषधोपचार, जेवण, नाष्टा देण्यात येणार आहे.'' तसेच HRCT Score 5 पेक्षा कमी असायला हवा. या कक्षात HRCT Score आणि Oxygen Level ही तपासली जाणार आहे. विलगीकरण कक्षात रुग्णांवर डॉ. ऋतुराज देशमुख, डॉ. अविना पाटील, डॉ. रेश्‍मा दबडे, डॉ. प्रसाद कदम, डॉ. पल्लवी कदम यांच्याकडून उपचार केले जाणार आहेत. hrct 5 पेक्षा कमी पाहिजे.

सातारा : शे-पाचशे घेऊन मृताचा चेहरा दाखविणा-यांची हाेणार चाैकशी

Oxygen 30 Bed Facility At Godoli Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT