Nagar panchayat election
Nagar panchayat election sakal
सातारा

गृहराज्यमंत्र्यांच्या पॅनेलचा धुव्वा; पाटणकरांनी सत्ता राखली

जालिंदर सत्रे

पाटण : पाटण नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत (five year election of Nagar Panchayat) गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या पॅनेलचा 15-2 असा फरकाने धुव्वा करीत युवानेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी एकहाती सत्ता राखली. भाजप व काँग्रेसला खाते खोलता (BJP and Congress)आले नाही. जिल्हा बँक निवडणुकीतील(District Bank Elections) विजयानंतर आत्मविश्वास बळावलेल्या राष्ट्रवादीने नगरपंचायतीवर पुन्हा झेंडा फडकविला असुन सत्यजितसिंह पाटणकरांनी पाटणवर माझेच राज्य याची प्रचिती गृहराज्यमंत्र्यांना दिली आहे.

पाच प्रभागात झालेल्या राष्ट्रवादी अंतर्गत मैत्रीपुर्ण लढतीत विद्यामान नगराध्यक्ष व माजी नगराध्यक्षांना पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेनेने मागील दोन जागा राखण्यात यश मिळविले असले तरी मंत्रीपद असतानाही त्यांना संख्याबळ वाढविण्यात अपयश आल्याचे निवडणुक निकालावरुन स्पष्ट होत आहे. काँग्रेसने सहा जागेवर उमेदवार उभे केले होते मात्र त्यांना काते खोलता आले नाही.

भाजपचे विद्यमान नगरसेवर सागर माने यांचा त्यांच्याच हक्काच्या प्रभागात नवख्या उमेदवाराकडुन पराभव पत्करावा लागला आहे. गटांतर्गत मोठा विरोध असणाऱ्या विद्यमान उपनगराध्यक्ष सचिन कुंभार यांनी विजय मिळविला असुन विद्यमान नगरसेविका संगिता देवकांत यांचे पुन्हा नगरपंचायतीत आगमन झाले आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी 14, शिवसेना दोन व भाजप एक असे बलाबल होते. त्यामद्ये शिवसेनेने आपल्या जागा राखल्या असुन भाजपला जागा गमवावी लागल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ 15 झाले असुन नेत्यांसह राष्ट्रवादीचे मनोबल वाढविणारा हा निकाल असुन शंभुराज देसाई यांच्या मंत्रीपदाचा नगरपंचायतीत कोणताही परिणाम झालेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT