Pankaja Munde visited Shambhu Mahadev Temple at Shikhar Shingnapur esakal
सातारा

Pankaja Munde : 'शंभू महादेवा, महाराष्ट्रावरचं 'हे' संकट दूर कर'; पंकजा मुंडेंचं शिखर शिंगणापुरात साकडं

मुंडे यांनी शंभू महादेवाची लघुरुद्र महापूजा केली.

सकाळ डिजिटल टीम

आज समाजाच्या रक्षणासाठी मोठा भाऊ या नात्याने मी पंकजा यांना ही तलवार भेट देत आहे, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

शिखर शिंगणापूर/दहिवडी : शंभू महादेवा (Shambhu Mahadev) महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट दूर कर, भरपूर पर्जन्यवृष्टी होऊ दे, सुखसमृद्धी नांदू दे, असे साकडे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शंभू महादेवाला घालत मनोभावे प्रार्थना केली. या वेळी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) उपस्थित होते.

माजी मंत्री मुंडे काल शक्ती परिक्रमेदरम्यान माण- खटाव तालुक्यांत आल्या होत्या. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी त्यांचे कुलदैवत शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाचे दर्शन घेऊन केली. मुंडे यांनी शंभू महादेवाची लघुरुद्र महापूजा केली. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय व उदयनराजे उपस्थित होते.

या वेळी उदयनराजे यांनी पंकजा मुंडे यांना तलवार भेट दिली. देवस्थान ट्रस्टच्या वतीने व्यवस्थापक मंदार पत्की यांनी पंकजा मुंडे, तसेच उदयनराजे भोसले यांचे स्वागत केले. या वेळी सर्वपक्षीय, तसेच भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, पंकजा मुंडे जलसंधारणमंत्री असताना प्रभाकर देशमुख हे जलसंधारण सचिव होते. त्या वेळी पंकजा मुंडे यांनी माण-खटाव तालुक्यांत जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नदी पुनरुज्जीवन व सिमेंट बंधारे या जलसंधारण कामांसाठी ११६ कोटींचा निधी देऊन संरक्षित पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी त्यांना कृतज्ञता सन्मान पत्र देऊन त्यांचा सत्कार केला.

दरम्यान, दहिवडी येथे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे, वडील भगवानराव गोरे, दहिवडीचे नगराध्यक्ष सागर पोळ, भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, महिलाध्यक्षा साधना गुंडगे, रासपचे बबनराव वीरकर, वैशाली वीरकर, तसेच डॉ. राजेंद्र खाडे आदींनी पंकजा मुंडे यांचा सत्कार केला.

समाजाच्या रक्षणासाठी मोठा भाऊ या नात्याने तलवार भेट : उदयनराजे

सर्व जातिधर्मांतील उपेक्षित समाजाला बरोबर घेऊन जाण्याचे कार्य (कै.) गोपीनाथ मुंडे साहेबांनी केले असून, त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन मुंडे भगिनी समाजात कार्यरत आहेत. स्वराज्याच्या स्थापनेसाठी भवानी मातेने शिवरायांना तलवार भेट दिली होती. आज समाजाच्या रक्षणासाठी मोठा भाऊ या नात्याने मी पंकजा यांना ही तलवार भेट देत आहे, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरलं! 'वैद्यकीय पदवी नसताना चालवला दवाखाना'; तीन बोगस डॉक्टरांवर गुन्हा, अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया

Pune News: शीव, पाणंद, रस्त्यांची गावदप्तरी नोंद होणार; जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे समितीची राज्य सरकारला शिफारस

'मी जेवणात उंदीर खाल्लाय' 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, 'हे ऐकून माझ्या....'

Ahilyanagar Crime:'सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवले'; अकोले तालुक्यात उडली खळबळ

Latest Marathi News Live Updates : रायगडमध्ये तूफान पाऊस, रेड अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT