Online  esakal
सातारा

Online वाहन नोंदणीस 'परिवहन'ची परवानगी; 'या' E-mail वरती होणार वाहनांची नोंदणी

गेल्या तीन महिन्यांपासून राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

प्रशांत घाडगे

सातारा : संचारबंदी लागू होण्यापूर्वी वाहनांची विक्री करूनही आरटीओ कार्यालयात नोंदणी न झालेल्या वाहनांची ऑनलाइन पध्दतीने नोंदणी (Online Vehicle Registration) करण्यास परिवहन आयुक्त कार्यालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे सातारा उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयातही ऑनलाइन नोंदणी सुरू असून, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात हा निर्णय घेण्यात आला आहे. (Permission For Online Vehicle Registration From The Transport Office Satara News)

गेल्या तीन महिन्यांपासून राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने 14 एप्रिलपासून संचारबंदी लावली आहे. ही संचारबंदी एक जूनपर्यंत असणार आहे. या कालावधीत अत्यावश्‍यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सर्व सरकारी कार्यालयांतील ऑफलाइन कामे थांबली आहेत. राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्येही केवळ ऑनलाइन पध्दतीने कामकाज सुरू ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यात संचारबंदी लागू होण्यापूर्वी अनेक नागरिकांनी वाहने खरेदी केलेले आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या संख्येने वाहने खरेदी करत नागरिकांनी अगोदरच बुकिंगही करून ठेवली होती. या वाहनांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहेत. मात्र, 14 तारखेपासून संचारबंदी लागू करण्यात आल्याने आरटीओ कार्यालयाचे कामकाज बंद झाल्याने अशा वाहनांची नोंदणी न झाल्याने वाहनमालकांचा खोळंबा झाला होता. त्यामुळे आता नोंदणी करण्यासाठी वाहन वितरकांना अर्ज केल्याची प्रत आरटीओ कार्यालयाच्या ई-मेलवर (dyrto.11-mh@gov.in) सादर करावयाची आहे. या वाहनांचे नोंदणी शुल्क व कर भरल्यानंतर संबंधित अर्जास मोटार वाहन निरीक्षक ऑनलाइन मान्यता दिल्यानंतर पुढील पूर्तता होणार आहे. या वाहनांची नोंदणी करण्याची मागणी राज्यातील वाहन वितरकांकडून करण्यात आली होती. त्यानुसार अटी व शर्तीचे पालन करून ऑनलाइन पध्दतीने वाहन नोंदणी करण्यास परिवहन आयुक्त कार्यालयाने परवानगी दिली आहे.

ई-मेलवर अर्ज सादर करा

कोरोनाच्या काळात संचारबंदी लागू असेपर्यंत आधी विक्री केलेल्या वाहनांची ऑनलाइन नोंदणीची आहे. त्यासाठी वाहन वितरकांना वाहन नोंदणीसाठी संबंधित आरटीओच्या ई-मेलवर (dyrto.11-mh@gov.in) अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज, विमा, पत्त्याचा पुरावा सादर करावा लागणार असून चॅसीस पेन्सिल प्रिंट, छायाचित्रही जोडावे लागणार आहे.

ऑनलाइन वाहन नोंदणीची सवलत संचारबंदी असेपर्यंत सुरू राहणार आहे. या नोंदणीसाठी सर्व कागपत्रांची पूर्तता करण्याची आवश्‍यकता असून, वाहन वितरकांनी अर्ज करताना हमीपत्र सादर करणे गरजेचे आहे.

-विनोद चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा

Permission For Online Vehicle Registration From The Transport Office Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT