सातारा

खुनाचा प्रयत्न, मारामारीसह खंडणीच्या गुन्ह्यातील कऱ्हाडच्या युवकांवर तडीपारीची कारवाई

प्रवीण जाधव

सातारा : कऱ्हाड शहर हद्दीत खुनाचा प्रयत्न, मारामारी, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यामध्ये सहभागी असणाऱ्या टोळीतील चौघांना पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सातारा जिल्ह्यासह सांगलीतील लगतच्या तालुक्‍यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. अभिनंदन रतन झेंडे (वय 39, रा. शनिवार पेठ, कऱ्हाड), प्रतीक उर्फ बबलू परशुराम चव्हाण (वय 25, रा. रैनाक गल्ली, शनिवार पेठ, कऱ्हाड), परशुराम रमेश करवले (वय 20, रा. कृष्णा घाट, सोमवार पेठ, कऱ्हाड), अविनाश प्रताप काटे (वय 23, रा. महात्मा फुले चौक, बुधवार पेठ, कऱ्हाड) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर गर्दी मारामारी, खुनाचा प्रयत्न, बेकायदा हत्यार बाळगणे, खंडणी, जबरी चोरी, सरकारी नोकरांना मारहाण करून गंभीर जखमी करणे असे विविध गंभीर स्वरूपाचे कायदे आहेत. 

त्यांच्या वर्तनात सुधारणा होण्यासाठी वारंवार प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या, तरीही त्यांच्या सुधारणा झाली नाही. अगदी हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे सुरू असतानाही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. या टोळीचा सर्वसामान्य नागरिकांना उपद्रव होत होता. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यामुळे त्यांना हद्दपार करण्याबाबत कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांनी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता.

महाबळेश्वर : कर्जाच्या फसवणुकप्रकरणी पिंपरी चिंचवडच्या एकास अटक; औरंगाबादच्या एकाचा शाेध सुरु

असे साहेब किती, सांमटीत हिंडे राती; 'ही' म्हण क-हाड पालिकेत ठरली खाेटी 

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किशोर धुमाळ यांनी छाननी करून हा प्रस्ताव अधीक्षक बन्सल यांच्यासमोर पाठविला होता. या प्रस्तावाच्या सुनावणी दरम्यान सहायक फौजदार मधुकर गुरव यांनी ठोस पुरावे सादर केले. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून अधीक्षक बन्सल यांनी चारही संशयितांना संपूर्ण सातारा जिल्हा, तसेच सांगली जिल्ह्यातील कऱ्हाडच्या लगत असलेल्या कडेगाव, वाळवा व शिराळा या तीन तालुक्‍यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्योच आदेश काढले आहेत. जिल्ह्यामध्ये दहशत पसरविणाऱ्या गुंडावर यापुढेही अशाच प्रकारची कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस अधीक्षक बन्सल यांनी दिला आहे.

बसण्यापूर्वीच करा वयाचा विचार, अन्यथा खावी लागणार तुरुंगाची हवा; जाणून घ्या हे महत्वाचे नियम

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: "दारू पाजून कट रचवला"; जरांगे पाटील हत्याकट प्रकरणात नवा ट्विस्ट! अटक आरोपीच्या पत्नीचे धक्कादायक आरोप

Uddhav Thackeray : सरकार तुमच्या तोंडाला पाने पुसतंय, महायुतीला व्होटबंदी करा; उद्धव ठाकरेंचे शेतकऱ्यांना आवाहन

Nashik Crime : नाशिक: ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले! 'काठे गल्ली' सिग्नलजवळ ६.५ ग्रॅम एमडीसह चौघे अटकेत

Congress Leader Kolhapur : कोल्हापुरात काँग्रेस नेत्याचा बंगला फोडला, पत्नीवर धारधार शस्त्राने वार; कुरिअर बॉय असल्याचा बहाण्याने रोकड लुटली

चाकणकरांवर टीका, पक्षानं धाडली नोटीस; रूपाली ठोंबरे म्हणाल्या, वेळ खूपच कमी

SCROLL FOR NEXT